मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत हेल्मेटसाठी गर्दीच गर्दी, पण ‘त्या’ 500 रुपयांच्या हेल्मेटने जीव वाचणार का? पोलीस सक्तीचा बाजारात उलटा परिणाम

---Advertisement---

धारणीत हेल्मेटसाठी गर्दीच गर्दी, पण ‘त्या’ 500 रुपयांच्या हेल्मेटने जीव वाचणार का? पोलीस सक्तीचा बाजारात उलटा परिणाम
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या हेल्मेट मोहिमेमुळे दुकानात तोबा गर्दी, मात्र बोगस ISI मार्क हेल्मेटची विक्री जोरात | पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या जनजागृतीच्या उद्देशाला हरताळ

युवा मेलघाट न्यूज ब्युरो
धारणी /अमरावती, 24 जून 2026 : अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या संकल्पनेतून 22 जूनपासून जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. “दुचाकी चालवताना हेल्मेट नेहमी घाला” या संदेशासह पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहेत. या मोहिमेचा तात्काळ परिणाम दिसून आला असून अमरावती जिल्हासह धारणी शहर व ग्रामीण भागातील हेल्मेट विक्रेत्यांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मात्र, या सक्तीमुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे – दंडाच्या भीतीपोटी नागरिक जीव वाचवणारे हेल्मेट घेत आहेत की फक्त कारवाईपासून वाचण्यासाठी कोणतेही हेल्मेट खरेदी करत आहेत?


500 रुपयांचे हेल्मेट आणि जीवाचा प्रश्न?
पोलीस कारवाई सुरू होताच बाजारात 400 ते 500 रुपयांना मिळणाऱ्या स्वस्त हेल्मेटची मागणी प्रचंड वाढली आहे. मिळेल ते हेल्मेट, मग ते कितीही हलक्या दर्जाचे असेना, नागरिक खरेदी करताना दिसत आहेत. अनेक हेल्मेटवर नुसताच ISI चा शिक्का छापलेला असून त्याचा दर्जा संशयास्पद आहे. वाहनधारक नामदेव राठोड म्हणाले, “500 रुपयांचा दंड भरून काय फायदा? त्यापेक्षा हेच हेल्मेट घेऊन ठेवतो. पोलीस अडवणार नाहीत. पण अपघातात हे डोक्याचे रक्षण करेल का, याची शाश्वती नाही.”


पोलिस प्रशासनचा उद्देश आणि बाजाराची वास्तविकता
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचा उद्देश स्पष्ट आहे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करणे. अमरावती ग्रामीणमध्ये गेल्या वर्षी झालेल्या अपघातात 60% पेक्षा जास्त मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने झाले आहेत. हा उद्देश अत्यंत स्तुत्य आहे. परंतु, सध्या बाजारात दिसणारे चित्र वेगळेच आहे. पोलिसांचा उद्देश ‘जीव वाचवणे’ हा आहे, तर नागरिकांचा उद्देश ‘दंड वाचवणे’ झाला आहे आणि विक्रेत्यांचा उद्देश ‘नफा कमावणे’ झाला आहे. यामध्ये मूळ जनजागृतीचा हेतूच बाजूला पडत आहे.


बोगस हेल्मेटची खुलेआम विक्री, कारवाई कोणावर?
शहरातील अनेक दुकानांमध्ये ISI प्रमाणित नसलेले, अत्यंत हलक्या प्लास्टिकपासून बनवलेले हेल्मेट विकले जात आहेत. या हेल्मेटला अपघाताच्या धक्क्याने वाचवण्याची क्षमता शून्य आहे. उलट असे हेल्मेट तुटून डोक्याला अधिक इजा होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. “ISI मार्कची तपासणी करूनच हेल्मेट खरेदी करा”, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे. मात्र, रस्त्यावर उभे राहून तपासणी करणाऱ्या पोलिसांकडे प्रत्येक हेल्मेटचा दर्जा तपासण्यासाठी वेळ किंवा साधने नाहीत. त्यामुळे केवळ ‘डोक्यावर हेल्मेट आहे का’ एवढेच पाहिले जात आहे.
प्रशासनासमोर आव्हान: आता खरी जबाबदारी पोलीस व जिल्हा प्रशासनावर आहे.

  1. विक्रेत्यांवर कारवाई: बोगस व निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विकणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकून कारवाई करणे गरजेचे आहे.
  2. जनजागृती: केवळ दंडाची भीती न दाखवता ‘चांगले हेल्मेट हेच तुमचे सुरक्षा कवच आहे’ हे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
  3. ISI मार्क ओळख: खरा ISI मार्क कसा ओळखावा याबाबत ठिकठिकाणी माहिती फलक लावणे गरजेचे आहे. BIS च्या bis.gov.in वेबसाईटवरून लायसन्स नंबर टाकून हेल्मेट असली की नकली तपासता येते.
    तज्ञांचे मत: जीव स्वस्त नाही
    अपघात तज्ञ डॉ. सांगतात, “हेल्मेट म्हणजे केवळ डोक्यावरची टोपी नाही. ते तुमच्या कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे. ISI मार्क असलेले, डोक्यात व्यवस्थित बसणारे, स्ट्रॅप मजबूत असलेले हेल्मेटच घ्या. 1200-1500 रुपये खर्च होतील, पण आयुष्यभराची कमाई वाचेल.” पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सुरू केलेली मोहीम योग्य दिशेने असली तरी, केवळ सक्ती करून चालणार नाही. त्यासाठी बाजारातील बनावटगिरीवर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांचे समुपदेशन करणे, ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा ‘हेल्मेट सक्ती’ ही मोहीम केवळ हेल्मेट विक्रेत्यांच्या फायद्याची ठरेल आणि अपघातात जीव जाण्याचे सत्र सुरूच राहील. कारवाईचा बडगा महत्वाचा आहेच, पण त्यासोबत ‘चांगल्या हेल्मेटची’ सक्ती करणे हीच खरी जनजागृती ठरेल.
---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

_युवा मेलघाट न्यूज़ सोमवार दि. 31 ऑगस्ट 2026

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज़ शनिवार दि.15 ऑगस्ट 2026

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

Leave a Comment