मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

रामगोपाल मावस्कर यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर

---Advertisement---

रामगोपाल मावस्कर यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर
1 जुलै रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान; टिटाम्बा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

युवा मेलघाट न्यूज़ प्रतिनिधि
धारणी, 27 जून: धारणी तालुक्यातील टिटाम्बां येथील प्रगतिशील शेतकरी रामगोपाल सुखराम मावस्कर यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 23 जून 2026 रोजी पत्र काढून याबाबत कळविले आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन 2024 चा हा पुरस्कार रामगोपाल मावस्कर यांना जाहीर झाला आहे.

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी डॉम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-18 येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मावस्कर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व दोन नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यांचा प्रवास, उपस्थिती व इतर आवश्यक खर्च कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रामगोपाल मावस्कर यांनी टिटाम्बां परिसरात नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल धारणी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

_युवा मेलघाट न्यूज़ सोमवार दि. 31 ऑगस्ट 2026

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज़ शनिवार दि.15 ऑगस्ट 2026

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

Leave a Comment