मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी पार्थ प्रफुल्लराव लोडम यांची नियुक्ती

---Advertisement---

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी पार्थ प्रफुल्लराव लोडम यांची नियुक्ती

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. 28 जून: महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुगत उर्फ सुगतानंद तुळशीराम भटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी पार्थ प्रफुल्लराव लोडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे तसेच सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय असलेल्या पार्थ लोडम यांच्यावर संघटनेने ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, संघटना गावागावांत बळकट करणे आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुगतानंद भटकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून पार्थ लोडम यांची अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.

यावेळी अरविंद जानराव लोडम, बबन श्रीराम लोडम, सुनील भुजंगराव लोडम, चंद्रशेखर अरुण लोडम, बाळासाहेब भरतराव लोडम, गणेश शेषराव लोडम, दिगंबर जनार्दन उगले, मोरेश्वर दिवाकर काळे व यश लोडम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शेतकरी संघटनांकडून पार्थ लोडम यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.`

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज़ शनिवार दि.15 ऑगस्ट 2026

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

शासकीय कार्यक्रम आणि माध्यम: शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रशासन, विभाग, जनता आणि पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असणे ही आजच्या काळाची गरज आहे.

धारणी: मनरेगाच्या बिलापोटी 10 हजारांची लाच मागितली, लाचलुचपतच्या सापळ्यात पंचायत समितीचा कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक जाळ्यात

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची दोन दिवशीय प्रांत स्तरीय बैठक संपन्न, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

Leave a Comment