मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

---Advertisement---

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क _______________ _______ अमरावती – मेळघाटातील सेमाडोह व जाम्भू येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींवर अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले आहेत. अपघातातील रुग्ण मिथुन सावलकर, विवेक धिकार आणि सुनील जावरकर हे इर्विनमध्ये दाखल होताच युवा स्वाभिमान पक्षाने तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दसऱ्याच्या दिवशीही वेळ न दवडता थेट इर्विन गाठले. त्यांनी वॉर्ड नंबर 3 आणि अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, त्यांना धीर दिला आणि नातेवाईकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

ही बाब आमदार श्री. रविभाऊ राणा यांना समजताच त्यांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. रुग्णांवर त्वरित आणि कोणतीही कमतरता न ठेवता औषधोपचार करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. डॉक्टरांना ‘रुग्णांच्या काळजीत कोणतीही हयगय करू नका’ अशी ठाम सूचना करण्यात आली.

यावेळी धारणी पंचायत समितीचे माजी सभापती सुखलाल सावलकर उपस्थित होते.

अशा संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून माणुसकी जपली पाहिजे, हेच युवा स्वाभिमानने कृतीतून दाखवून दिले आहे. या संवेदनशील पुढाकारामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला असून, प्रशासनालाही आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

धारणी येथे आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनसमस्या निवारण आढावा बैठक संपन्न

Leave a Comment