मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी येथे आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनसमस्या निवारण आढावा बैठक संपन्न

---Advertisement---

धारणी येथे आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनसमस्या निवारण आढावा बैठक संपन्न: जनतेच्या समस्या सोडविणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि शासकीय सेवा अधिक गतिमान करणे हाच या बैठकीचा मुख्य उद्देश

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क –
धारणी, ता. 14 ऑक्टोबर :
मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे जनसमस्या निवारण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धारणी व चिखलदरा तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान महावितरण विभाग, सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित असलेल्या तक्रारी व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, विजेच्या समस्या, कर्ज प्रकरणे, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई या विषयांवर अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळविण्याच्या प्रक्रियेबाबतही या बैठकीत विशेष चर्चा झाली. वनपट्ट्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, शासनाचे नियम आणि पात्रता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या. अनेक पात्र आदिवासी कुटुंबे कागदपत्रांअभावी वनपट्ट्यापासून वंचित राहत असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार केवलराम काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. जनतेच्या समस्या सोडविणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि शासकीय सेवा अधिक गतिमान करणे हाच या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी शुक्ला, धारणीचे तहसीलदार शेवाळे, नायब तहसीलदार माळी, तालुका कृषी अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी रजस, सहकारी संस्थांचे अधिकारी अरबट, तसेच राष्ट्रीयीकृत बँका व सहकारी बँकांचे अधिकारी आणि आमदारांचे स्वीय सहाय्यक राहुल सोनोने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment