मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

दुष्काळ जाहीर, पण पंचनामेच नाहीत; धारणीचा शेतकरी अडकला प्रतीक्षेत : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुढील खरीप हंगाम धोक्यात; वरूडमध्ये आदेश, धारणीत मात्र शांतता – शेतकऱ्यांचा सवाल – पंचनामे कधी होणार?

---Advertisement---

दुष्काळ जाहीर, पण पंचनामेच नाहीत; धारणीचा शेतकरी अडकला प्रतीक्षेत : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुढील खरीप हंगाम धोक्यात; वरूडमध्ये आदेश, धारणीत मात्र शांतता – शेतकऱ्यांचा सवाल – पंचनामे कधी होणार?

युवा मेलघाट न्यूज़ ________________________________ धारणी (जि. अमरावती) – महाराष्ट्र शासनाने धारणी तालुक्याला अधिकृतपणे दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिके पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे पूर्णतः जळून खाक झाली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई आणि मदतीची अपेक्षा ठेवून शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत आहे, मात्र प्रत्यक्षात पंचनामा करण्यासाठी नेमलेल्या पटवारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनाच अद्याप कोणतेही लेखी आदेश प्रशासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे धारणीचा बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा किसान मोर्चा शहर अध्यक्ष चन्द्रशेखर खार्वे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सचिव महेश मालवीय, भाजपा माजी शहर अध्यक्ष सुशील गुप्ता यांनी शेतकऱ्यांच्या वतीने उप जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसमोर दुहेरी पेच

निवेदनात म्हटले आहे की, सध्या धारणीतील सर्व कास्तकार बांधव आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी आपल्या शेतातील खराब झालेली पिके काढून शेताची सफाई आणि मशागत करण्यासाठी आतुर आहेत. परंतु, जोपर्यंत शासकीय पंचनामा होत नाही, तोपर्यंत शेतात हात लावता येत नाही. पंचनामा न झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही, या भीतीने शेतकरी शेत तसेच ठेवून हतबलपणे आदेशाची वाट पाहत आहेत. यामुळे पुढील हंगामाची तयारी खोळंबली आहे.

वरूडमध्ये आदेश, धारणीत का नाही?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेजारील वरूड तहसीलमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना पीक पंचनामा करण्याचे आदेश प्राप्त झाले असून तेथे काम सुरू झाले आहे. मग धारणी तालुक्यासाठीच ही दिरंगाई का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

एकाच पटवाऱ्याकडे तीन-तीन साजे, काम कसे होणार?

निवेदनात आणखी एक गंभीर वास्तव समोर आले आहे. धारणी तालुक्यात अनेक पटवाऱ्यांकडे तीन-तीन साजांचा अतिरिक्त कार्यभार आहे. अशा परिस्थितीत जर पंचनाम्याचे काम वेळेवर सुरू झाले नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायला महिनोनमहिने लागतील. तोपर्यंत पेरणीची वेळ निघून जाईल. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या –

१. धारणी तालुक्यातील सर्व संबंधित पटवारी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे लेखी आदेश द्यावेत.
२. कोणताही भेदभाव न करता तालुक्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक साजा आणि प्रत्येक प्रभावित शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा समान पद्धतीने करावा.
३. ज्या पटवाऱ्यांकडे तीन-तीन साजे आहेत, तेथे अतिरिक्त कर्मचारी देऊन कामाचा बोजा कमी करावा व काम गतीने पूर्ण करावे.
४. पंचनामा विहित वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करू द्यावी आणि शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.

दुष्काळाच्या आगीत आधीच होरपळलेल्या मेलघाटच्या शेतकऱ्याला प्रशासनाच्या या दिरंगाईने आणखी संकटात लोटले आहे. प्रशासन आता तरी जागे होऊन तात्काळ आदेश काढणार का, याकडे संपूर्ण धारणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.


---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment