मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

चिखलदऱ्यातील श्री जनाबाई मंदिराच्या मालकी हक्कावरून वाद पेटला: अंबादेवी ट्रस्टने बेकायदेशीर कब्जा केल्याचा विद्रोही संघटनेचा आरोप; स्वाक्षरी मोहीम सुरू

---Advertisement---

चिखलदऱ्यातील श्री जनाबाई मंदिराच्या मालकी हक्कावरून वाद पेटला: अंबादेवी ट्रस्टने बेकायदेशीर कब्जा केल्याचा विद्रोही संघटनेचा आरोप; स्वाक्षरी मोहीम सुरू : पेसा कायदा व पाचव्या अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचा दावा, मंदिर मुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क –
चिखलदरा (मेळघाट) – चिखलदरा तालुक्यातील खोल दरीत वसलेल्या स्वयंभू श्री जनाबाई मंदिराच्या मालकी हक्कावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे मंदिर आदिवासी अस्मितेचे प्रतीक असून त्यावर अमरावतीच्या अंबादेवी ट्रस्टने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला असल्याचा गंभीर आरोप विद्रोही संघटनेने केला आहे.

या संदर्भात विद्रोही संघटनेने “उठा! जागे व्हा! अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारा!” अशी क्रांतिकारी हाक देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

काय आहे आरोप?
संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर अनादी काळापासून कोरकू, भिल्ल, गोंड, आंध, निहाल, गवळी समाजाच्या श्रद्धेचे आणि संस्कृतीचे जागृत केंद्र आहे. येथे रूढी-परंपरेनुसार पूजा, नवस व पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे केले जातात. मात्र, काही वर्षांपूर्वी अंबादेवी ट्रस्टने शासन-प्रशासनाची दिशाभूल करून, ग्रामसभेची परवानगी न घेता मंदिर व सभोवतालच्या ३ एकर जमिनीवर कागदोपत्री मालकी हक्क मिळवला, असा आरोप आहे.

कायदेशीर आधार:
या ताब्यामुळे
१) पेसा कायदा १९९६ कलम ४(d) आणि ४(i) – ग्रामसभेच्या अधिकारांचे उल्लंघन,
२) संविधान कलम २५ व २६ – धार्मिक स्वातंत्र्यावर गदा,
३) पाचवी अनुसूची – अनुसूचित क्षेत्रातील जमीन हस्तांतरणावर निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

ट्रस्टवर व्यापारीकरणाचे आरोप:
ट्रस्टने पारंपरिक पूजा बंद करून व्हीआयपी दर्शनाची व्यापारी प्रथा सुरू केली, मंदिरातील दानाची रक्कम चिखलदऱ्याच्या विकासावर खर्च न करता अमरावतीला नेली जात आहे आणि भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व निवासाची कोणतीही सुविधा नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

स्वाक्षरी मोहीम:
हा ताबा मोडून काढण्यासाठी विद्रोही संघटनेने व्यापक स्वाक्षरी मोहीम (Signature Campaign) सुरू केली आहे. स्थानिक समाजबांधवांकडून सही व आधार कार्ड घेऊन विशेष मागणी अर्ज जिल्हाधिकारी व शासनाला पाठवण्यात येणार आहे. आपल्या हक्काचे मंदिर मुक्त करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी संघटनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन विद्रोही संघटनेने केले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment