मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

खोडगाव येथील कर्जदाराला दिलासा, खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्तक्षेपाने घर परत मिळण्याचा मार्ग मोकळा

---Advertisement---

खोडगाव येथील कर्जदाराला दिलासा, खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्तक्षेपाने घर परत मिळण्याचा मार्ग मोकळा

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क _________________________ खोडगाव ता. अंजनगाव सुर्जी : खोडगाव येथील विवेक दुर्योधन रामेकर यांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीकडून घरासाठी कर्ज घेतले होते. दुष्काळजन्य परिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे काही हप्ते थकल्याने संबंधित कंपनीने त्यांच्या घरावर ताबा मिळवून कुलूप लावले होते.

या घटनेची माहिती मिळताच अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आज खोडगाव येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी यावेळी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून तसेच कंपनीच्या वकिलांशी चर्चा करून सदर प्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

खासदार वानखडे यांनी विवेक रामेकर यांना 24 तासांच्या आत घराचा ताबा पूर्ववत करून देण्याचे निर्देश कंपनीला दिले. अन्यथा आपण स्वतः कुलूप तोडून संबंधित कुटुंबाला त्यांचे घर परत मिळवून देऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी प्रदीपभाऊ देशमुख, सुरेशभाऊ नेमाडे, खारोडेभाऊ, देविदासभाऊ देशमुख, वाघभाऊ, रमेशभाऊ सावळे, कैलासभाऊ शिरसाट यांच्यासह खोडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment