राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजितदादा गट) धारणी शहर अध्यक्षपदी विवेक प्रकाश धनेवार यांची नियुक्ती; पाणी पुरवठा सभापतींवर शहर अध्यक्षाची नवी जबाबदारी
युवा मेलघाट न्यूज / धारणी प्रतिनिधी –
धारणी 1 नोव्हेंबर 2026/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) च्या धारणी शहर अध्यक्षपदी युवा नेते विवेक प्रकाश धनेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित धारणी नगर पंचायत पाणी पुरवठा सभापती असलेल्या धनेवार यांच्यावर पक्षाने शहर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांच्यावर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष निखीलदादा ठाकरे यांच्या मान्यतेने आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या विचारधारेला अनुसरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अमरावती ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष अंकुश भोजराज घारड यांनी दिनांक 01/11/2026 रोजी विशेष नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, धनेवार हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून धारणी शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करतील.
या नियुक्ती सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, धारणी अल्पसंख्याक सेलचे गुड्डूभाई, युवक राष्ट्रवादीचे अंकुश घाडगे, मेलघाट समन्वयक (SIR) श्रीपाल पाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर विवेक धनेवार यांच्यावर चाहत्यांकडून आणि शुभचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वरिष्ठांचे आभार, अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार – धनेवार
आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना विवेक धनेवार म्हणाले, “माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा आभारी आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या विकासाच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे.”
विवेक धनेवार यांच्या नेतृत्वाखाली धारणी नगर क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल आणि नगर पंचायतीमधील प्रलंबित समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.









