धारणीवालों की “अवैध” जमीन अब होगी “अपनी”; 31 दिसंबर 2026 लास्ट डेट तहसीलदार धारणी का धमाका – 15 साल पुराने घरों को मिलेगा पट्टा, फटाफट अर्ज करे!
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
धारणी दि. 8 मई | अरे धारणीकरांनो, खुशखबर ऐका! तुमच्या घरासमोरचा तो प्लॉट, जिथे 2011 पासून घर बांधून राहताय, पण कागदावर “अतिक्रमण” लिहिलंय… आता सरकार त्यालाच ” कायदेशीर” करणार आहे! धारणी चे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी मोठी घोषणा केली – 1 जानेवारी 2011 च्या आधीचे 500 ते 1500 चौ. फुटाचे सगळे घरकुल अतिक्रमणं नियमित होणार। म्हणजे तुमच्या घराला सरकारी शिक्का मिळणार, पट्टा मिळणार।
पण लक्षात ठेवा – 3 मोठ्या अटी: पण लक्षात ठेवा – 3 मोठ्या अटी:
- वन-जमीन / गायरान ? – त्यावरचा कब्जा नियमित होणार नाही फक्त महसूलची जागा।
- डेडलाईन पक्की : 31 डिसेंबर 2026 – नंतर रडून उपयोग नाही। आजच ग्रामसेवक गाठा।
- 1500 चौ. फुटाच्या वर ? मग स्कीम नाही। मोठ्या बंगल्यांना माफी नाही।
काय घेऊन जायचं ? लाईट बिल, घर पट्टी पावती, आठ अ उतारा, वोटींग कार्ड बास इतकेंच।
फायदा काय ?
एकदा नियमित झाली की जमीन ‘वर्ग-2’ मध्ये नावावर होईल 5 वर्ष विकता येणार नाही, पण बँक लोन मिळेल, पोरांच्या नावावर करता येईल। “अतिक्रमण” चा डाग मिटेल।
तहसीलदार शेवाळे थेट बोलले:
“धारणीच्या गरीब माणसासाठी मोदी-फडणवीस सरकार मा. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची ही भेट आहे । लाईनीत उभं राहून अर्ज करा। ग्रामसेवककडे जावा। संघी सोडू नका।”










