मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

पोंभूर्णा येथे चौथी आदिवासी धर्म चिंतन परिषद: स्वतंत्र धर्मकोड साठी चंद्रपूर गडचिरोली एकवटणार

---Advertisement---

पोंभूर्णा येथे चौथी आदिवासी धर्म चिंतन परिषद, स्वतंत्र धर्मकोड साठी चंद्रपूर गडचिरोली एकवटणार

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क –
पोंभूर्णा, जि. चंद्रपूर: जल, जंगल, जमीन हीच आदिवासींची मूळ ओळख असून भारतीय जनगणनेत आम्हाला स्वतंत्र धर्मकोड मिळावा या ऐतिहासिक मागणीसाठी बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने चौथ्या आदिवासी धर्म चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही परिषद शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोंभूर्णा येथे सुमन मंगल कार्यालय, अक्सापूर रोड येथे आयोजित केली आहे. या परिषदेला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे, असे आयोजकांनी सांगितले.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक कालखंडात ज्या समाजाचा मूलाधार निसर्ग आहे, त्या आदिवासी समाजाला आज आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. 1871 पासून 1951 पर्यंत जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र रकाना होता, मात्र 1961 पासून तो रकाना हटविण्यात आला आणि आदिवासींना हिंदू म्हणून गणले जाऊ लागले. आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून त्यांची संस्कृती, रूढी परंपरा आणि जीवनपद्धती स्वतंत्र आहे. त्यामुळे 2027 च्या जनगणनेत स्वतंत्र आदिवासी धर्मकोड मिळावा यासाठी हे चिंतन आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.डाॅ.नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेश, नवी दिल्ली, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथजी मडावी हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. बसंतराव पुरके, माजी शिक्षणमंत्री, अ.भा.आ.वि.प. नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामसाहेब चव्हाण , मा. डि. बि. अंबूरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिरसा क्रांती दल हे प्रमुख अतिथी लाभणार आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रभाकरराव बोडले, माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि मा. डॉ. बी. डी. अंभे, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे.

विशेष अतिथी म्हणून मा. संतोषजी ठाकूर, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र, मा. रमेशजी गेडाम, अध्यक्ष नागपूर विभाग, बिरसा क्रांती दल, मा. श्यामराव पेंदोर, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा, बिरसा क्रांती दल, मा. विजयभाऊ कुसराम, अध्यक्ष गडचिरोली जिल्हा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख वक्ते म्हणून मा. विजयभाऊ कुमरे, मा. गोविंदराव मरसकोल्हे, मा. श्रीकांत भलावी, मा. मोहनलाल आत्राम, मा. गजनानराव सडमेक, मा. विश्वनाथ कोवे, मा. तुळशीराम भांडेकर, मा. गुलाबराव मडावी, मा. गोपीनाथ पुंगाटी, मा. महादेवराव कोवे, मा. मारोतराव मडावी, मा. सुनिल टेकाम, मा. हिवराजी आत्राम, मा. सुधाकरराव मडावी, मा. गोपीनाथ देरकर, मा. सुरेशभाऊ आत्राम, मा. नरेशभाऊ मडावी यांचे विचार मांडले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष श्री. अरुणभाऊ तलांडे, तालुका अध्यक्ष श्री. नवलसिंग मडावी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिलीपभाऊ मडावी, जिल्हा सचिव श्री. शरदभाऊ मा. आडे, तालुका सचिव श्री. नरेशराव मडावी, जिल्हा सदस्य श्री. महादेवराव पेंदोर, श्री. महादेवराव कंगाली, श्री. राजेश्वरराव कोडापे, श्री. सुदाम पेंदोर यांनी नियोजन केले असून सर्व सगासोयऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरसा क्रांती दल, जागतिक गोंड सगा मादी, गोंडवाना आंदोलन चळवळ, आदिवासी टायगर सेना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि समस्त आदिवासी समाज पोंभूर्णा यांनी परिश्रम घेतले आहेत.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment