मा. बच्चूभाऊ कडू विधान परिषद सदस्य निवडले, मेलघाटातून… शुभेच्छांचा वर्षाव! मे, शेवटी दौरा
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
धारणी दि. 8 मई | जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी अहोरात्र लढणारे नेतृत्व मा. ना. श्री. बच्चूभाऊ कडू यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या निवडीबद्दल मेलघाटातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।
शिवसेना जिल्हा संघटक मन्ना दारसिंबे, धारणी तालुका प्रमुख शैलेश मालवीय व धारणी नगर पंचायतचे सभापती सुरज मालवीय यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बच्चूभाऊंची भेट घेऊन त्यांना नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या।
यावेळी मेलघाटच्या विविध विषयावर चर्चा झाली । मे महिन्याच्या शेवटी बच्चूभाऊ कडू यांचा मेलघाट दौरा होणार असल्याची माहिती मन्ना दारसिंबे यांनी दिली ।

सभापती सुरज मालवीय यांची बच्चूभाऊंशी शुभेच्छा भेटीत प्रभाग-9 च्या विकासावर चर्चा
धारणी : स्वच्छता समिती सभापती तथा नगर पंचायत सभापती सुरज मालवीय यांनी विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या।
यावेळी सुरज मालवीय यांनी आपला प्रभाग क्रमांक 9 नेहरू नगर मधील विकास कामांवर बच्चूभाऊंशी सविस्तर चर्चा केली व प्रभागातील समस्या मांडल्या।










