भाजपा जिल्हा मेळघाट मध्ये आध्यात्मिक सेलवर मोठी जबाबदारी, पंडित सूर्यप्रकाशजी मिश्रा यांची जिल्हा संयोजक पदी नियुक्ती
युवा मेलघाट न्यूज़ –
धारणी : भारतीय जनता पार्टी जिल्हा मेळघाट, अमरावती ग्रामीण अंतर्गत एक महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. विजय रावजी जाधव मेळघाट जिल्हा प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली , जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर यांच्या मान्यतेने पंडित सूर्यप्रकाशजी मिश्रा यांची जिल्हा संयोजक, आध्यात्मिक सेल या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.



या संदर्भात देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात त्यांचे गुणगौरव केले आहे. मिश्राजी यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीवर आणि ध्येय-धोरणांवर विश्वास ठेवून पक्षात आजवर सक्रिय आणि निष्ठेने कार्य केले आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांची पक्षनिष्ठा, संघटनात्मक कौशल्य आणि कार्यतत्परता लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि आगामी काळात संघटना अधिक मजबूत व गतिशील होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार जनसेवेचे आणि संघटन वाढीचे कार्य ते यशस्वीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी या नियुक्तीबद्दल मिश्रा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंडित सुर्यप्रकाशजी मिश्रा यांच्या नियुक्ति वर त्यांच्या चाहते व अनुयायी यांनी शूभेच्छांची वर्षाव केली आहे.








