मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी पोलिसांची धड़क कारवाई: अवैध गोवंश मांस विक्रीचा धारणीत पर्दाफाश, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त – दोघांना बेड्या

---Advertisement---

पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने, ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांचा धारणीतील कुरेशी मोहल्लयात छापा: 110 किलो गोमांस, मोटरसाइकल सह साहित्य जप्त

युवा मेलघाट न्यूज़ | ब्यूरो
धारणी 13 जून 2026 : अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. विकेतन कदम यांच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशाची धारणी पोलिसांनी तातडीने अंमलबजावणी केली. ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकून अवैध गोमांस विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

काय घडले?
दिनांक 13/06/2026 रोजी पोलीस पथकाने शेख समीर शेख कबीर (वय 25) यांच्या राहत्या घरी धाड टाकली. घरामागील 80×10 फुटाच्या मोकळ्या जागेत गोवंश जातीचे जनावर कापून मांस विक्री सुरू होती. घटनास्थळावरून शेख नसीम शेख सुलतान (वय 34) यालाही ताब्यात घेण्यात आले.

Featured Vidio : धारणी पोलीस स्टेशन समोर आरोपी व जप्त मुद्देमालासह पोलीस पथक]

जप्त मुद्देमाल – एकूण किंमत ₹1,56,050/-
जप्त वस्तू अंदाजे किंमत

110 किलो गोमांस ₹38,000/-
मोटरसायकल MP 12 बी 3363 ₹65,000/-
लोखंडी तराजू, वजन काटे, सुरी, कुहाड ₹5,250/-
लाकडी ठोकळा व इतर साहित्य ₹1,950/-
मांस विक्रीतून मिळालेले ₹300/- ₹300/-

कायदेशीर कारवाई:
दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम 1975 सुधारणा 2019 चे कलम 5, 5(ब), 5(क), 9(अ) सह भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जनावराच्या मालकीबाबत कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत.

कारवाई करणारे पथक:
सदर कारवाई मा.पोलिस अधिक्षक सा. अमरावती ग्रामीण निकेतन कदम, अप्पर पोलिस अधिक्षक सा. अमरावती ग्रामीण दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी माधवराव गरुड़, यांच्या मार्गदर्शनाखाली PI अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि सतीश झालटे, पोहेकॉ/1479 सतीश राठोड, पोकाॅ/2848 जगत तेलगोटे, पोकाॅ/647 आदित्य सुरनार, पोकाॅ/2578 जिवन गोळंबे, पोकाॅ/2570 कृष्णा जामुनकर, मपोकाॅ/1973 कविता सोनोने, चालक पोहेकॉ/2287 नितीन लोकपुरे व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश कांबळे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment