मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाटात मंत्री अदिती तटकरे: “कुपोषण समूळ नष्ट करायचंय, आता फक्त कागदावर काम नको”

---Advertisement---

मेळघाटात मंत्री अदिती तटकरे: “कुपोषण समूळ नष्ट करायचंय, आता फक्त कागदावर काम नको”

युवा मेलघाट न्यूज ब्युरो
धारणी | शनिवार, २५ जुलै २०२६ | सन १९९३ पासून कुपोषणाच्या सावटाखाली असलेल्या मेळघाटात शनिवारी राज्य सरकारने थेट मोर्चा सांभाळला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिवसभर मेळघाटाचा दौरा करून अंगणवाडीपासून रुग्णालयापर्यंत सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या – “आता समन्वयाने काम करा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.” सकाळी १०:३० वाजता मंत्रींचा ताफा सर्वप्रथम भोकरबर्डी गावात दाखल झाला. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील या दुर्गम गावातील अंगणवाडीतील सुविधा, मुलांना दिला जाणारा पूरक आहार, वजन नोंदी आणि गर्भवती-स्तनदा मातांना मिळणाऱ्या सेवांची त्यांनी स्वतः पाहणी केली. अंगणवाडी सेविका आणि गावातील महिलांशी त्यांनी संवाद साधला. “शासनाची योजना शेवटच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर धुळघाट रोड आणि कळमखार येथील अंगणवाड्यांना अचानक भेटी दिल्या. नोंदवह्या, पोषण आहार, स्वच्छता आणि इमारतींची अवस्था तपासून जिथे जिथे त्रुटी आढळल्या तिथे तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.

कुपोषण, मातृ-बालमृत्यू, सिकलसेन व ॲनिमियावर काय म्हणाली मंत्री अदीति तटकरे : पहा YouTube विडियो

दुपारी मंत्री धारणी उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र NRC ला भेट दिली. तेथे दाखल असलेल्या कुपोषित बालकांची आणि त्यांच्या मातांची त्यांनी विचारपूस केली. डॉक्टरांकडून उपचार आणि आहाराबाबत माहिती घेतली. “कुपोषित बालक वेळेत ओळखून त्याच्यावर उपचार करणे हेच खरे यश आहे. यासाठी आरोग्य आणि महिला बालविकास विभागाने एकत्रितपणे काम केले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. यानंतर धारणी येथे दोन्ही विभागांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत मेळघाटातील गंभीर SAM आणि मध्यम MAM कुपोषित बालके, माता-बाल मृत्यूदर, सिकलसेल, ॲनिमिया, अमृत आहार योजना आणि अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीत मंत्री तटकरे म्हणाल्या, “१९९३ पासून आपण कुपोषणाचा कलंक पाठीवर घेऊन चाललो आहोत. आता तो धुवून काढायचा आहे. फक्त फायली हलवून चालणार नाही. प्रत्येक गर्भवती आणि प्रत्येक कुपोषित मूल शासनाच्या नजरेत असले पाहिजे.”

या आढावा बैठकीला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आयुक्त माधवी सरदेशमुख, उपायुक्त संगीता लोढे, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मळसाडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, माजी जि.प. अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, तहसीलदार प्रदीप शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे, गटविकास अधिकारी रजत कावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांच्यासह महिला व बालविकास, आरोग्य विभाग आणि प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रींच्या या दौऱ्यानंतर आता मेळघाटातील योजना कागदावर न राहता थेट जमिनीवर दिसतील, अशी आशा व्यक्त होत आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

Leave a Comment