मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची दोन दिवशीय प्रांत स्तरीय बैठक संपन्न, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

---Advertisement---

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची दोन दिवशीय प्रांत स्तरीय बैठक संपन्न, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
नागपूर, 26 जुलै 2026: अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची प्रांत स्तरीय दोन दिवशीय बैठक दिनांक 25 आणि 26 जुलै रोजी नागपूर येथे संपन्न झाली.

या बैठकीमध्ये परिषदेच्या राज्यभरातील विस्तारावर सविस्तर चिंतन आणि चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये TET ची अनिवार्यता रद्द करणे, पदोन्नती प्रक्रिया गतिमान करणे, शिक्षक भरती तातडीने करणे, कंत्राटी शिक्षकांबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वरिष्ठ वेतनवाढ देणे, अप्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करून त्यांचे एरिअर्स काढणे, तसेच जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची वेतनवाढ पूर्ववत लागू करणे या सर्व महत्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीला अमरावती जिल्ह्यातून मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे राज्य सचिव प्रा. प्रदीप खेडकर सर उपस्थित होते. तसेच जिल्हा पदाधिकारी श्री. रवी घवळे, जयश्री गरकल, ज्योती सानप आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment