मेळघाटात ‘सेन्ट्रल किचन’चा वाद पून्हा पेटणार; आदिवासी विकास मंत्रालयाच्या भूमिकेवर लक्ष : स्थानिकांच्या व ग्रामसभेच्या तीव्र विरोधाला न जुमानता हा घाट घातल्यास तीव्र संघर्ष होण्याचे चिन्हे
युवा मेलघाट न्यूज़ |धारणी प्रतिनिधी_____________ मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळांमधील टेंबली , बिजुधावाडी, , सावलिखेडा,सुसर्दा येथील जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि यापूर्वी जीवघेणी ठरलेल्या सेन्ट्रल किचन’ योजनेला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न आदिवासी विकास मंत्रालयाकडून सुरू असल्याचे सुत्रांन कडून माहीती मिळाली आहे. मात्र, स्थानिकांच्या व ग्रामसभेच्या तीव्र विरोधाला न जुमानता हा घाट घातल्यास तीव्र संघर्ष होण्याचे चिन्ह दिसत आहे.
ग्रामसभेची कोणतीही मंजुरी किंवा मागणी नसताना टेंबली येथील सेन्ट्रल किचन बळजोरीने सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. मंत्रालयातील काही वजनदार नेत्यांचे हितसंबंध या योजनेमागे असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळून आर्थिक लाटण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा मेळघाटात जोर धरत आहे.
याआधीही सेन्ट्रल किचनच्या निकृष्ट जेवणांमुळे विद्यार्थ्यांना विषबाधेचा सामना करावा लागला होता. दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी प्राणावर आलेले संकट टळले होते. टेंबलीचे किचन पुन्हा सुरू झाल्यास थेट प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा तयारीत सामाजिक कार्यकर्ते आहेत.
प्रशासन काय भूमिका घेणार?
यापूर्वी घडलेल्या गंभीर प्रकारानंतरही प्रशासन पुन्हा त्याच चुकीची पुनरावृत्ती करणारं का? असा संतप्त सवाल आता पालकवर्ग आणि सामाजिक संघटनांकडून विचारला जात असून, या मुद्द्यावर समन्वय ना साधलं गेले की मेळघाटात लवकरच मोठे राजकीय व सामाजिक वादळ पून्हा उठण्याची चिन्हे दिसत आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मंत्रालयातील काही अधिकारी आणि ठेकेदार मिळून या माध्यमातून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. मेळघाटातील एकही ग्रामसभा या सेन्ट्रल किचनच्या बाजूने नाही. जर प्रशासनाने बळाचा वापर करून किंवा परस्पर हा निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर आदिवासी समाज गप्प बसणार नाही. ज्या दिवशी हे किचन सुरू होईल, त्याच क्षणी आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि तीव्र जनआंदोलन उभारले जाईल; प्रसंगी मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्याची आमची तयारी आहे!”
_रमेश तोटे, सामाजिक कार्यकर्ते, मेळघाट.
—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084









