मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

तुमचा जुना लूक ठरेल मोठा धोका; ‘८० चे ट्रेंड’ गुन्हेगारांचे नवे हत्यार, सायबर पोलिसांचा इशारा: ८० च्या दशकाची स्पर्धा रंगली

---Advertisement---

तुमचा जुना लूक ठरेल मोठा धोका; ‘८० चे ट्रेंड’ गुन्हेगारांचे नवे हत्यार, सायबर पोलिसांचा इशारा : ८० च्या दशकाची स्पर्धा रंगली

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
अमरावती | सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘#८० चे दशक’ किंवा ‘८० चे ट्रेंड’ नावाचा एक नवा फोटो चॅलेंज तुफान व्हायरल होत आहे. ८० च्या दशकातील लूक, जुने कपडे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले ८० च्या दशकातील फोटो अपलोड करण्याची मोठी स्पर्धा युजर्समध्ये रंगली आहे. मात्र, हा ट्रेंड केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो तुमच्या डिजिटल सुरक्षिततेला मोठा धोका ठरू शकतो, असा थेट इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

सोशल मीडियावर कोणताही ट्रेंड आला की लोक आपले स्वतःचे फोटो शेअर करतात. सोशल मीडियावर सतत काहींना काही व्हायरल होत असते. काही व्ह्यूज आणि लाईक्ससाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ट्रेंड फॉलो देखील करतात. अशातच अनेकदा हे ट्रेंड धोकादायक आणि अडचणीत आणू शकतात. विशेष बाब म्हणजे राज्यातील झाडून सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, आमदार-खासदारांनी देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जनतेला कायदे शिकवणाऱ्या आणि जनतेने कायदे बनवण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीच अशा धोकादायक ट्रेंडला खतपाणी घालणे, हे अत्यंत गंभीर आहे.

आपले सोशल मीडिया अकाउंट नेहमी ‘पब्लिक’ ऐवजी ‘प्रायव्हेट’ ठेवा, जेणेकरून अनोळखी व्यक्ती तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकणार नाही. तुमचा जुना फोटो आणि बायोमेट्रिक डेटा वापरून गुन्हेगार डीपफेक तयार करू शकतात किंवा तुमची ओळख चोरू शकतात.

सोशल मीडियावर येणारा प्रत्येक ट्रेंड सुरक्षित असतोच असे नाही. कोणत्याही मोहाच्या किंवा मनोरंजनाच्या क्षणी आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हेच अधिक महत्त्वाचे आहे. सावध राहा, सुरक्षित राहा. काही संशयास्पद घडल्यास किंवा सायबर गुन्ह्यासंदर्भात तक्रार करायची असल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्र. १९३० वर संपर्क साधा किंवा http://www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर

—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

—Advertisement—

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment