धारणी पोलिसांची मोठी कारवाई – कत्तलीसाठी बांधून ठेवलेली 7 गोवंश जनावरे जप्त, किंमत 1 लाख 20 हजार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
युवा मेलघाट न्यूज ब्युरो
धारणी, जि. अमरावती – अवैध धंद्यांवर आणि गोवंश जनावरांची वाहतूक करून कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. श्री. निकेतन कदम, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी दिले असताना धारणी पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीकरीता बांधून ठेवलेली गोवंश जातीची 7 जनावरे किंमत अंदाजे 1,20,000 रुपयांची जप्त केली आहेत.

पोलीस स्टेशन धारणी ता. धारणी जि. अमरावती यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14/09/2026 रोजी ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीने गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने खा-या टेंभू गावात बांधून ठेवलेली आहेत अशी बातमी मिळाली. या बातमीवरून ग्राम खा-या टेंभू येथे जाऊन विचारपूस केली असता सदर गावात एका ठिकाणी 5 व दुसऱ्या ठिकाणी 2 अशी एकूण कत्तलीकरीता घेऊन जाण्याचे उद्देशाने बांधून ठेवलेली गोवंश जातीची 7 जनावरे आढळून आली.

साक्षीदारांना विचारपूस केली असता शेख समीर शेख गफ्फार, रा. धारणी याने दिनांक 13/09/2026 चे रात्री 09/00 वा ते 09/30 वा दरम्यान सदर गोवंश जनावरे ही कत्तल करण्याचे उद्देशाने बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आरोपी शेख समीर शेख गफ्फार, रा. धारणी, ता. धारणी, जि. अमरावती याचे विरुद्ध पो.स्टे. धारणी येथे दिनांक 14/09/2026 रोजी कलम 5, 5(ब) 9, 11 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976, कलम 11(3) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. अमरावती ग्रामीण, श्री. निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक सा. अमरावती ग्रा. श्री. दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अवतारसिंग चव्हाण, पोस्टाफ पोहेकॉ/1913 सुमित सुरजुसे, पोकॉ/183 रीतेश देशमुख, पोकॉ/2468 जगत तेलगोटे, पोकॉ/646 आदित्य सुरनार यांनी केली आहे.










