मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू: 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबरला प्रत्येक बूथवर BLO राहणार हजर, 18 वर्ष पूर्ण युवकांसाठी सुवर्णसंधी

---Advertisement---

धारणीत मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू: 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबरला प्रत्येक बूथवर BLO राहणार हजर, 18 वर्ष पूर्ण युवकांसाठी सुवर्णसंधी

युवा मेलघाट न्यूज ब्युरो
धारणी | भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अर्थात SIR 2026 हा संपूर्ण महाराष्ट्रासह मेळघाटातील धारणी तालुक्यातही अधिकृतपणे सुरू झाला आहे. याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालया द्वारे माहिती जारी करण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 हा संपूर्ण महिना दावे आणि हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 9 सप्टेंबर 2026 च्या पत्रानुसार धारणी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर चार विशेष दिवस शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर दिनांक 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 26 सप्टेंबर व 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजेपासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत चालणार आहे. या चारही दिवशी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर त्या बूथचे केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO हे स्वतः उपस्थित राहणार आहेत, जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही.

या शिबीरात नागरिकांकडून तीन प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. एक – नवीन मतदार नोंदणी अर्ज, दोन – मतदार यादीतील नाव, पत्ता, फोटो किंवा इतर नोंदीच्या दुरुस्ती करिता अर्ज, आणि तीन – मयत किंवा दुबार असलेले नाव वगळणीकरीता अर्ज.

प्रशासनाने विशेष आवाहन केले आहे की ज्या युवक-युवतींचे वय दिनांक 01/10/2026 या अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत लागलेले नाही, अशा सर्व युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मोठ्या संख्येने शिबीरात उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी अर्ज भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन सिद्धार्थ शुक्ला मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांनी केले आहे.

धारणी सारख्या दुर्गम भागात प्रत्येक मतदारापर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा हा प्रयत्न असून सर्व नागरिकांनी आपले मतदान केंद्र गाठून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment