मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

अखेर मेळघाटच्या वनहक्काला गती! धारणीत 17, 18, 19 सप्टेंबरला वनहक्क दाव्यांच्या अंतिम कार्यवाहीसाठी महामोहीम, SDO धारणींचे ग्रामसभांना अल्टिमेटम

---Advertisement---

अखेर मेळघाटच्या वनहक्काला गती! धारणीत 17, 18, 19 सप्टेंबरला वनहक्क दाव्यांच्या अंतिम कार्यवाहीसाठी महामोहीम, SDO धारणींचे ग्रामसभांना अल्टिमेटम

युवा मेलघाट न्यूज ब्युरो
धारणी – मेळघाटातील हजारो आदिवासी कुटुंबांच्या अस्मितेचा आणि हक्काचा प्रश्न असलेल्या वनहक्क दाव्यांवर तब्बल वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या फाईल्स आता धूळ खात पडून राहणार नाहीत. वनहक्क कायदा 2006 अंतर्गत रखडलेल्या वैयक्तिक आणि सामुहिक दाव्यांच्या अंतिम कार्यवाहीसाठी प्रशासनाने आता थेट मैदानात उडी घेतली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी अत्यंत महत्वाची महामोहीम जाहीर केली आहे.

काय आहे आदेश?
धारणी उपविभागातील सर्व संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, येत्या 17, 18 आणि 19 सप्टेंबर 2026 या तीन दिवसात युद्धपातळीवर काम करून ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांनी ग्रामसभेत गठित केलेल्या सर्व वैयक्तिक आणि सामुहिक वनहक्क दाव्यांची अंतिम पूर्तता करायची आहे.

या तीन दिवसात काय होणार? महसूल आणि वन विभागाचे अधिकारी एकत्र येऊन प्रत्येक दाव्याची कसून तपासणी करणार आहेत. दाव्यासोबत जोडलेली कागदपत्रे, उपलब्ध पुरावे, जुने अभिलेख, दाव्यातील क्षेत्र नेमके किती, सीमांकन कुठे आहे, या सगळ्याची स्थळपडताळणी आणि अभिलेखीय पडताळणी केली जाणार आहे.

त्यानंतर प्रत्येक दाव्याबाबत ग्रामस्तरीय वनहक्क समितीला कायदेशीर तरतुदीनुसार स्पष्ट निर्णय नोंदवावा लागणार आहे – हा दावा मंजूर आहे, नामंजूर आहे की अंशतः मंजूर आहे.
अंतिम मुदत – 30 सप्टेंबर, 1 आणि 2 ऑक्टोबर

ग्रामपातळीवर अंतिम झालेला प्रत्येक दावा, ग्रामस्तरीय समितीच्या शिफारशीसह दि. 30 सप्टेंबर, 1 व 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत उपविभागस्तरीय वनहक्क समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे. आता टाळाटाळ नाही. या विशेष मोहिमेमुळे मेळघाटातील प्रलंबित वनहक्क दाव्यांना न्याय मिळणार असून हजारो आदिवासींना त्यांच्या जल, जंगल, जमिनीवरील हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

संबंधित ग्रामसभा, वनहक्क समित्या आणि ग्रामसेवकांनी या कालबद्ध कार्यक्रमाचे तंतोतंत पालन करावे, असे कडक आवाहन सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी यांनी केले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment