मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क –
चिखलदरा / अमरावती : मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया खताचा काळाबाजार बंद करून शासन दर 266 रुपये प्रमाणे युरिया देण्याबाबत हतरू ग्रामपंचायतीचे उपसरपंच भैय्यालाल मुन्शी मावस्कर यांनी केलेल्या निवेदनाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे.
दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या पत्रानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती कार्यालयाने दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी आदेश काढले आहेत. जा.क्र. जिअकृअ/गुनि/रासायनिक-खते/निवेदन/ 5548 /2026 अन्वये हा आदेश तालुका कृषी अधिकारी चिखलदरा / धारणी आणि पंचायत समिती चिखलदरा / धारणी येथील कृषी अधिकारी (गुनि) यांना देण्यात आला आहे.


या आदेशात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांच्या दराबाबत, किमान किरकोळ किंमतीचे शासनाचे धोरण, अनुदानित खतांचे शासकीय दर, बाजारात खतांचा काळाबाजार किंवा कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती द्यावी.
तसेच शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा व्हाट्सअप क्रमांक 8080536602 आणि शेतकरी तक्रार निवारण कक्ष याची माहिती द्यावी.
जिल्ह्यातील कृषी केंद्र निहाय दैनंदिन खतांचा साठा पारदर्शकपणे बघण्यासाठी असलेला ब्लॉग https://adozpamravati.blogspot.com या लिंकची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा.
या आदेशावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अजय साव यांनी स्वाक्षरी केली आहे. या कार्यवाहीमुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
_______ Advertisement _____________________ धारणी की एकमेव विश्वसनीय कृषी केन्द्र








