धारणीत युवा स्वाभिमानचा एल्गार; झेडपीसाठी एकही जागा नाही मिळाली तर पाचही जागा स्वबळावर लढवून जिंकणार – राजकुमार मालवीय यांचा निर्धार युवा स्वाभिमान पार्टीने संघटनात्मक कंबर कसली
धारणी (प्रतिनिधी) | युवा मेलघाट न्यूज –
धारणी 1 नोव्हेंबर 2026 / मेळघाट विधानसभा क्षेत्रातील धारणी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने संघटनात्मक कंबर कसली आहे. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी B&C रेस्ट हाऊस धारणी येथे पार पडलेल्या तालुका आढावा व कार्यकर्ता संमेलन बैठकीत नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजकुमार जगन्नाथ मालवीय यांनी आक्रमक भूमिका मांडली.



बैठकीत तालुक्यातील संघटनाची सद्यस्थिती, बूथस्तरावर करावयाची बांधणी आणि जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी जोडण्यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिचंद जांबेकर, माजी पंचायत समिती सदस्य शालिकराम जांबेकर, लीला उंबरकर, गायत्री रामदास धोत्रे, राहुलकुमार पटेल, रूपेश मालवीय, देवेंद्र टीप, मुकेश मालविय, बंटी ठाकूर, नीरज मालवीय, अर्जुन पवार, दयाशंकर पाल, बाबू मानेकर, मनीष मालवीय, अविनाश मावस्कर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकुमार मालवीय यांचा रोखठोक बयान
बैठकीनंतर दिपावली स्नेहमिलन चा औचित्य साधुन प्रसारमाध्यमांशी बोलताना तालुकाध्यक्ष राजकुमार मालवीय यांनी युतीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “मेळघाट विधानसभा क्षेत्रातील धारणी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी कमीत कमी एक सीट युतीमध्ये मिळाली तरच युती राहणार. अन्यथा पक्ष नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवला तर आम्ही पूर्ण ताकदीने सर्व पाचही सीटवर युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार उभे करून आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकून आणणार.”



यावेळी त्यांनी दीपावलीच्या शुभ अवसरावर सर्व पत्रकार बंधूंसाठी दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह (PWD Rest House), धारणी येथे स्नेह मिलन समारोहाचे आयोजन केले होते. मेळघाटच्या सर्व पत्रकार बांधवांना एका व्यासपीठावर बोलावून त्यांचा सम्मान करणारे ते राजकीय पक्षाचे पहिले अध्यक्ष ठरले. दिपावली स्नेह मिलन सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी आपलीं भुमिका स्पष्ट केली. नवनियुक्त अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या समर्थकासह युवा स्वाभिमान पक्षाची जोरदार सुरुवात केली. त्यांची कार्यशेली बघून युवा स्वाभिमान पक्ष मेळघाटात निश्चितच बळकट होणार व विरोधकांना आव्हान उभे करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
पक्षाचे संस्थापक श्री. रवि भाऊ राणा, जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ साबळे आणि मार्गदर्शक श्री. सुनील भाऊ राणा यांच्या नेतृत्वाखाली धारणी तालुक्यातील प्रत्येक गावात संघटन पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.








