मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी तहसीलदारांचा ‘अत्यंत महत्त्व’चा शिक्का; ५ मंडळात ७ दिवसात संयुक्त पंचनामा, नाहीतर कारवाई – शेतकऱ्यांचा संभ्रम दूर, आता कामाला वेग

---Advertisement---

धारणीत दुष्काळ पंचनाम्याचा आदेश २८ सप्टेंबरलाच जारी; ५ मंडळात ७ दिवसात संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करण्याचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे सक्त निर्देश :अखेर धारणी हादरला! दुष्काळाच्या पंचनाम्याला ब्रेक लागला नव्हता, तर आदेश निघाला होता २८ सप्टेंबरलाच

युवा मेलघाट न्यूज | धारणी एक्सक्लुझिव्ह
अमरावती / धारणी – मेळघाटच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. धारणी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊनही पंचनामे होत नसल्याचा आरोप होत असताना, वस्तुस्थिती वेगळीच समोर आली आहे. मा. तहसीलदार तथा दंडाधिकारी प्रदीप शेवाळे धारणी यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजीच ‘अत्यंत महत्त्व / नैसर्गिक आपत्ती’ या शेऱ्याखाली लेखी आदेश काढला आहे. हा आदेश युवा मेलघाट न्यूज च्या हाती लागला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला संभ्रम दूर होणार आहे.

काय आहे त्या सरकारी आदेशात?

हा आदेश साधा-सुधा नाही. राज्य शासनाच्या दोन मोठ्या निर्णयांच्या आधारे काढला आहे. १. शासन निर्णय दि. २५ सप्टेंबर २०२६ – मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील Trigger-1 (प्रथम टप्पा) लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

२. कृषी आयुक्तांचे पत्र दि. २६ सप्टेंबर २०२६ – खरीप २०२६ च्या नुकसान भरपाईची प्रक्रिया तात्काळ सुरू करा. या दोन्हीच्या अनुषंगाने धारणी तहसील कार्यालयाने (क्र. अ.का./म.स./नै.आ./कावि. /२०२६, दि. २८/०९/२०२६) थेट फिल्डवरील सर्व यंत्रणांना कामाला लावले आहे.

कोणाला दिला आदेश? – संपूर्ण यंत्रणा मैदानात

यावेळी प्रशासनाने फक्त तलाठ्यावर जबाबदारी टाकली नाही, तर ६ विभागांचा संयुक्त पंचनामा पथक तयार केला आहे.

आदेश प्राप्त अधिकारी:
गट विकास अधिकारी (पं.स. धारणी), तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (सावलीखेडा, धारणी, हरीसाल, साद्राबाडी, धूळघाट), सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व ग्रामविकास अधिकारी आणि सर्व कृषी सहाय्यक.

कुठे होणार पंचनामा?

धारणी तालुक्यातील सर्वात जास्त बाधित असलेल्या पाचही मंडळात हे काम होणार आहे –
१) सावलीखेडा २) धारणी ३) हरीसाल ४) साद्राबाडी ५) धूळघाट या मंडळातील प्रत्येक गाव, प्रत्येक साजा आणि प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा होणार आहे.

७ दिवसांची डेडलाईन! यादी थेट पोर्टलवर

या आदेशातील सर्वात कडक आणि दिलासा देणारी ओळ म्हणजे – “आपापल्या गावातील नैसर्गिक आपत्ती बाधित शेतकऱ्यांचा संयुक्त पंचनामा ७ दिवसाचे आत पूर्ण करावे. तसेच संबंधित कास्तकार यांचे आधार कार्ड/बँक खाते व मोबाईल क्रमांक नुसार यादी करण्याकरीता संपूर्ण कार्यवाही करावी. यामध्ये कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी.”

म्हणजेच, फक्त पंचनामा करून फॉर्म भरायचा नाही, तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती – आधार, बँक खाते, मोबाईल नंबरसह शासनाच्या पोर्टलवर अपलोड करायची आहे, जेणेकरून नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होईल.

पार्श्वभूमी काय होती?

दि. ३० सप्टेंबर रोजी काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, धारणी यांना निवेदन देऊन सांगितले होते की, वरूडमध्ये आदेश निघाले पण धारणीत नाहीत. शेतकरी पुढील पेरणीसाठी शेत साफ करू शकत नाहीत. मात्र आता समोर आलेल्या २८ तारखेच्या आदेशामुळे हे स्पष्ट झाले आहे की, प्रशासनाने आधीच पावले उचलली आहेत. काही पटवाऱ्यांकडे तीन-तीन साजे असल्याने कामाला उशीर होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रारही या निमित्ताने समोर आली आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तात्काळ आपल्या गावातील तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपल्या शेताचा पंचनामा करून घ्यावा आणि आधार, बँक पासबुक झेरॉक्स तयार ठेवावी.

प्रशासन जागेवर, आता चेंडू फिल्डवरील अधिकाऱ्यांच्या कोर्टात!

मा. तहसीलदार धारणी प्रदीप शेवाळे यांनी आदेश काढला, प्रतिलिपी जिल्हाधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी धारणी यांनाही पाठवली आहे. आता हा ७ दिवसांचा अल्टिमेटम फिल्डवरील कर्मचारी पाळतात का? मेळघाटच्या बळीराजाला वेळेत न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोफत वीजचा GR निघाला, पण बिलावर ‘शून्य’ कधी? ₹४८ हजार कोटींच्या माफीची कागदोपत्री प्रतीक्षा कायम! बिलावर बकाया रकम शेतकर्यांनसाठी चिंतेची बाब

मेळघाट अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार; आ. रविभाऊ राणांचा संवेदनशील पुढाकार, प्रकाश साबळेंकडून रुग्णालयात धाव

अहम की लडाई में परिवार के साथ पिसता समाज, अब रावण दहन के साथ अपने अहम का भी दहन जरूरी

मेळघाटातील युरिया काळाबाजार विरोधात उपसरपंच भैय्यालाल मावस्कर यांच्या तक्रारीची दखल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचे निर्देश

Leave a Comment