धारणीत जनसमस्या निवारण आढावा बैठक: आमदार केवलराम काळेंच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी प्रशासकीय इमारतीत बैठक, शेतकरी-बँकिंग व MSEDCL प्रश्नांवर होणार तोडगा
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क ___________________________ धारणी – धारणी तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी जनसमस्या निवारण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
बैठकीचा तपशील:
दिनांक: शुक्रवार, ०९ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
स्थान: नवीन प्रशासकीय इमारत (SDO कार्यालय, धारणी)
बैठकीतील प्रमुख विषय:
१. नागरिक व शेतकऱ्यांच्या कृषी अधिकारी, महावितरण (MSEDCL) आणि सहकारी संस्थांशी संबंधित समस्या.
२. धारणी व चिखलदरा तालुक्यातील बँकिंग अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा.
३. विविध शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करणे.
या बैठकीला संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी व नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन येण्याचे आवाहन आमदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
संपर्क: राहुल सोनोने, स्वीय सहाय्यक, आ. केवलरामजी काळे – 94053 18955








