मेलघाटात MECL व ‘परिवर्तन’चा मोठा उपक्रम: 4,000 जणांची सिकलसेल तपासणी पूर्ण, 1,200 पोषण किट्सचे वाटप सुरू ; ‘ बिजुधावडी, पोहरा, दुनी गावात MECL प्रकल्पाचा धडाका: 1200 किट्सचे वाटप
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क ___________________________ धारणी / मेळघाट: दुर्गम व आदिवासीबहुल मेळघाट परिसरातील कुपोषण आणि सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ‘परिवर्तन समाज विकास समिती’ (PSVS) या नामांकित सामाजिक संस्थेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. संस्थेच्या वैद्यकीय पथकाने मेळघाटातील विविध आश्रमशाळा व गावांमध्ये तब्बल ४,००० विद्यार्थी व नागरिकांची सिकलसेल रक्ततपासणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या तपासणीनंतर आता मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (MECL) (भारत सरकारचा उपक्रम, खान मंत्रालय) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी अंतर्गत १,२०० विशेष पोषण किट्स वाटपाच्या मोहिमेचा प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे.


या पोषण आहार वाटपाचा शुभारंभ शासकीय आदिवासी आश्रमशाळा बिजुधावडी तसेच पोहरा आणि दुनी या ग्रामपंचायत क्षेत्रांतून एकाच वेळी उत्साहात करण्यात आला. या तिन्ही ठिकाणी गरजू विद्यार्थी, सिकलसेल बाधित बालके आणि अशक्त कुटुंबांना पोषण किट्सचे वाटप करण्यात आले. याच क्रमाने परिवर्तन समाज विकास समितीचे फिरते पथक पुढील सर्व नियोजित आश्रमशाळा आणि दुर्गम पाड्यांमध्ये पोहोचून एकूण १,२०० पोषण किट्सचे वाटप पूर्ण करणार आहे.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (MECL) या उपक्रमाच्या सामाजिक बांधिलकीचे मेळघाटवासीयांकडून विशेष कौतुक करण्यात आले. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेऊन मोफत रक्ततपासणीसह सकस पोषण आहाराची उपलब्धता करून दिल्याबद्दल मेकल व्यवस्थापनाचे जाहीर आभार मानण्यात आले.
या संपूर्ण अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP), धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला (PO) यांच्या सक्षम, संवेदनशील आणि गतिमान प्रशासकीय नेतृत्वाची सर्वस्तरांतून प्रशंसा होत आहे. प्रकल्प अधिकारी महोदयांच्या तत्पर सहकार्यामुळे, शाळा व्यवस्थापन व आरोग्य यंत्रणेत उत्तम समन्वय साधला गेला आणि अत्यंत कमी कालावधीत ४,००० विद्यार्थ्यांची तपासणी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ शकली.
परिवर्तन समाज विकास समितीच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये:
मेळघाटातील आश्रमशाळांमध्ये जाऊन ४,००० मुलांची अचूक सिकलसेल चाचणी व डिजिटल नोंदणी पूर्ण.
सिकलसेल वाहक व रुग्णांना राष्ट्रीय मोहिमेनुसार रंगीत हेल्थ कार्डांचे वाटप व समुपदेशन.
कुपोषणावर मात करण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त सत्तू, शेंगदाणा-गूळ चिक्की, काळे खजूर, भाजलेला हरभरा आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण १,२०० पोषण किट्सचे वाटप.
गंभीर आजारी बालकांसाठी उपजिल्हा रुग्णालय (SDH) धारणी येथे तात्काळ मोफत संदर्भ सेवा व उपचार साखळी.
बिजुधावडी आश्रमशाळा, पोहरा आणि दुनी गावातील यशस्वी वाटपानंतर परिवर्तन समाज विकास समिती मेळघाटातील उर्वरित सर्व आश्रमशाळांमध्ये ही मोहीम अविरतपणे राबवणार आहे.
परिवर्तन संस्थेची प्रमुख चमू ची सक्रिय सहभाग मिळत आहे.या अभियान चे प्रमुख नेतृत्व व संस्था प्रमुख श्री विनय मालवीय, श्री दीपक राव जी, श्री शिवम मालवीय सह संस्थेची पूर्ण चमू या कार्यात सक्रिय आहे. या चमू मध्ये श्री बलराम यादव जी, श्री तरुण जी, श्री सूरज जी, श्री तुलाराम जी एवं श्री मनीष जी, रविंद्र पोयम एव सहदेव शनिवारे सह गावातील प्रमुख व्यक्ती शासकीय कर्मचारी यांचा उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर उपक्रम द्वारे लोकांना चांगला लाभ मिळत आहे.








