मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी ते IIM अहमदाबाद: शिक्षणाच्या बळावर मेळघाटच्या प्रथम मालवीया याचे यश ; आजी-आजोबा यांचा आशीर्वाद

---Advertisement---

धारणी ते IIM अहमदाबाद: शिक्षणाच्या बळावर मेळघाटच्या प्रथम मालवीया याचे यश ; आजी-आजोबा यांचा आशीर्वाद

युवा मेलघाट न्यूज | अहमदाबाद प्रतिनिधी
धारणी, दि. 27 जून 2026 : “शिक्षण हेच खरे धन आहे” या उक्तीची प्रचिती देत मेळघाटच्या धारणी गावातील मालवीया कुटुंबाने तीन पिढ्यांच्या कष्टातून यशाचे नवे शिखर सर केले आहे. धारणी येथील सुप्रसिध्द पत्रकार युवा मेलघाट न्यूज चे संपादक व सामाजिक नेते दीपक मालवीया ‘दीपश्री’ व सौ. सारिका दीपक मालवीया यांचे सुपुत्र प्रथम दीपक मालवीया याची आशिया खंडातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे. या निवडीने केवळ मालवीया कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण मेळघाट आणि अमरावती जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

तीन पिढ्यांची शैक्षणिक परंपरा: प्रथमच्या यशामागे त्याच्या कुटुंबाची मजबूत शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. प्रथमचे स्वर्गीय आजोबा कै. फुलचंद देवासा मालवीया यांनी आपल्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यांनी धारणी येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून पदवीचे शिक्षण घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि सागर विद्यापीठातून उच्च शिक्षण संपादन केले होते. स्वर्गीय आजी कै. कमला फुलचंद मालवीया यांची त्यांना कायम साथ लाभली. आजोबांच्या शिक्षणाच्या याच वारशाला पुढे नेत प्रथमचे वडील दीपक मालवीया ‘दीपश्री’ हे आज पत्रकारितेच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत.

प्रथमचा खडतर शैक्षणिक प्रवास: प्रथम मालवीया याने आपल्या शिक्षणाची सुरुवात धारणी येथील मोन्टफोर्ट शाळेतून केली. इयत्ता 5 वी पर्यंत तेथे शिक्षण घेतल्यानंतर, त्याची निवड नवोदय विद्यालय, अमरावती येथे झाली. 6 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण त्याने नवोदयमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्याने कुरुक्षेत्र, हरियाणा येथून B.Tech ची पदवी प्राप्त केली. सातत्याने अव्वल राहणाऱ्या प्रथमने अथक परिश्रमाने CAT सारखी देशातील सर्वात अवघड मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळवला आहे.
बहीणही इंजिनिअर: मालवीया कुटुंबाची शैक्षणिक यशाची परंपरा येथेच थांबत नाही. प्रथमची लहान बहीण कु. पूर्णिमा दीपक मालवीया ही नामांकित डी.वाय.पाटील महाविद्यालयातुन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. एकाच घरातील दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत असल्याने परिसरात मालवीया कुटुंबाचा आदर्श निर्माण झाला आहे.

हे यश आजी-आजोबांच्या व गुरुजनांचे आशीर्वादाचे फळ”: प्रथमच्या या यशानंतर आई-वडील सौ. सारिका व दीपक मालवीया भावुक झाले. “आमच्या वडिलांनी म्हणजेच प्रथमच्या स्वर्गीय आजोबांनी ज्या जिद्दीने शिक्षण घेतले, तोच वारसा प्रथमने पुढे नेला आहे. आज ते हयात असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. हे यश त्यांचे व गुरुजनांचे आशीर्वादाचे फळ आहे,” अशी भावना दीपक मालवीया व सौ.सारिका ताई यांनी व्यक्त केली. मेळघाटसारख्या आदिवासी व दुर्गम भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपल्या मेहनतीच्या बळावर IIM अहमदाबादसारख्या संस्थेत प्रवेश मिळवणे ही निश्चितच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडू नका, स्वप्ने मोठी बघा आणि ती पुर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करा’ हाच संदेश विद्यार्थ्यांनां आहे.

students Corner IIM Ahmedabad

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

अमरावती ग्रामीण पुलिस में बड़ा फेरबदल : 17 पुलिस निरीक्षकों के तबादले धारणी के नये ठाणेदार शेषराव नितनवरे; अवतारसिंग चव्हाण इनका अचलपूर तबादला

धारणी तालुक्यातील जांबु शाळेत प्रवेशोत्सवाचा उत्साह, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तक वाटप

मेलघाट के बच्चे आज भी शिक्षा के लिए जिला छोड़ने को मजबूर, सर्व शिक्षा अभियान पर उठे सवाल ?

वनरक्षक भर्ती 2023 के आंदोलन को ‘यश’ मिला, मंत्री के आश्वासन पर 7 दिन बाद उपोषण समाप्त

वट पौर्णिमा: पति की लंबी उम्र और अखंड सौभाग्य का पर्व, वट वृक्ष पूजा का पौराणिक महत्व

बलई समाज के मेधावी छात्रों का 5 जुलाई को सम्मान समारोह, 30 जून तक दें जानकारी: सबल बलई कल्याणकारी संस्था का आव्हान

Leave a Comment