मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

22 जूनपासून अमरावती ग्रामीणमध्ये हेलमेट सक्ती: विना हेलमेट पकडले तर लायसन्स 3 महिने रद्द

---Advertisement---

SP निकेतन कदम यांचा जाहिरनामा जारी, चालक आणि मागे बसणाऱ्यालाही ISI मार्क हेलमेट बंधनकारक

युवा मेलघाट न्यूज़ | अमरावती प्रतिनिधि
अमरावती 09 जून 2026: दुचाकी अपघातात वाढती मृत्यूसंख्या रोखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांनी दिनांक 22/06/2026 पासून संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यात हेलमेट सक्ती लागू करण्याचा जाहिरनामा काढला आहे.

का घेतला निर्णय? SP कार्यालयाची आकडेवारी:
वर्ष एकूण अपघात दुचाकी अपघातांचे प्रमाण
2024 – 579
2025 – 519
1 जाने ते 31 मे 2026 – 222 70% अपघात मोटरसायकल चालकांचे
पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत्युमुखी पडणाऱ्या बहुतांश दुचाकीस्वारांनी हेलमेट घातलेले नव्हते, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.

काय आहे नवीन नियम?

  1. हेलमेट सक्ती: राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण व शहरी रस्त्यांवर दुचाकी चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही ISI मार्क असलेले हेलमेट घालणे बंधनकारक.
  2. कारवाईचा इशारा: 22 जून 2026 पासून विशेष मोहीम. विना हेलमेट आढळल्यास मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 नुसार दंडात्मक कारवाई होईल.
  3. लायसन्स रद्द: वारंवार नियम मोडणाऱ्या चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.

पोलिसांचे आवाहन:
“सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार! दुचाकी चालवताना हेलमेटचा वापर नक्की करा.”
हेलमेट हा केवळ दंडापासून वाचण्याचा उपाय नसून तुमच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

Leave a Comment