SP निकेतन कदम यांचा जाहिरनामा जारी, चालक आणि मागे बसणाऱ्यालाही ISI मार्क हेलमेट बंधनकारक
युवा मेलघाट न्यूज़ | अमरावती प्रतिनिधि
अमरावती 09 जून 2026: दुचाकी अपघातात वाढती मृत्यूसंख्या रोखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांनी दिनांक 22/06/2026 पासून संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यात हेलमेट सक्ती लागू करण्याचा जाहिरनामा काढला आहे.
का घेतला निर्णय? SP कार्यालयाची आकडेवारी:
वर्ष एकूण अपघात दुचाकी अपघातांचे प्रमाण
2024 – 579
2025 – 519
1 जाने ते 31 मे 2026 – 222 70% अपघात मोटरसायकल चालकांचे
पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत्युमुखी पडणाऱ्या बहुतांश दुचाकीस्वारांनी हेलमेट घातलेले नव्हते, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.
काय आहे नवीन नियम?
- हेलमेट सक्ती: राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण व शहरी रस्त्यांवर दुचाकी चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही ISI मार्क असलेले हेलमेट घालणे बंधनकारक.
- कारवाईचा इशारा: 22 जून 2026 पासून विशेष मोहीम. विना हेलमेट आढळल्यास मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 नुसार दंडात्मक कारवाई होईल.
- लायसन्स रद्द: वारंवार नियम मोडणाऱ्या चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.
पोलिसांचे आवाहन:
“सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार! दुचाकी चालवताना हेलमेटचा वापर नक्की करा.”
हेलमेट हा केवळ दंडापासून वाचण्याचा उपाय नसून तुमच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे.













