मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

---Advertisement---

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

युवा मेलघाट न्यूज | प्रतिनिधी
धारणी | कठीण परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास सोडला नाही आणि थेट पीएच.डी.पर्यंत मजल मारली! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, भोकरबर्डी येथील कर्तव्यदक्ष शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथून “शिक्षक-शिक्षिकांचा आनंद निर्देशांक” या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी पटकावली आहे.

मेळघाटसारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना घडवत असतानाच स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नाही. पण प्रा. राठोड यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हे करून दाखवले आणि संपूर्ण मेळघाटाचे नाव उंचावले. त्यांच्या या ऐतिहासिक यशाचा भोकरबर्डी येथे थाटात सत्कार करण्यात आला. भोकरबर्डीचे उपसरपंच रोहित श्रीपाल पाल यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

सेवा करताना शिक्षण – हीच खरी प्रेरणा”
यावेळी उपसरपंच रोहित पाल यांनी कौतुक करताना सांगितले, “दुर्गम भागात राहून समाजसेवा करत पीएच.डी. मिळवणे म्हणजे तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे. प्रा. राठोड यांच्या संशोधनाचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही होणार आहे.” प्रा. राठोड यांच्या संशोधनात “शिक्षक आनंदी असेल तरच विद्यार्थी घडेल” या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

या सत्कार समारंभाला वानखेडे सर, बोथे सर, पारडे सर, जारी सर, गहुकर सर, हरणे सर, गुंड सर, बारड सर, चौधरी सर, तांडील मॅडम, धूप्पे सर, नीचित सर यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात आणि अभिमानाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने सिद्ध केले की, मेळघाटातही गुणवत्तेला कमी नाही. प्रा. संजयकुमार राठोड यांच्या पुढील संशोधन वाटचालीसाठी सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

मेळघाटच्या १४,४९१ मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित: ८ ऑगस्ट शेवटची तारीख; उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन, वेळेत न भरल्यास नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता

Leave a Comment