मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

राज्यात पावसाची तूट कायम, १४ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थितीचे सावट

---Advertisement---

राज्यात पावसाची तूट कायम, १४ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थितीचे सावट

धारणी / मुंबई, दि. ६ – राज्यात यंदा मान्सूनने सरासरी गाठली नसल्याचे चित्र समोर आले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या केवळ ८६.२ टक्के पाऊस झाला आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत ८१५.३ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७०२.६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. जून आणि जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती, मात्र ऑगस्ट महिन्यात केवळ ५०.९ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

सर्वाधिक पावसाची तूट नंदुरबार जिल्ह्यात आहे. तेथे अपेक्षित ७०५.६ मि.मी. पावसाच्या तुलनेत केवळ ३३८.९ मि.मी. म्हणजेच ४८ टक्के पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर ५५.६ टक्के, लातूर ५८.५ टक्के, अमरावती ५९.२ टक्के, परभणी ६१.६ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ६२.९ टक्के पाऊस झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमीच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला तरी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूर भागातील परिस्थिती चिंताजनक आहे. वेळेवर समाधानकारक पाऊस न झाल्यास सोयाबीन, कापूस, मका आणि तूर, मूग यांसारख्या कडधान्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यातील एकूण परिस्थिती पाहता १४३ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर २१२ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस आहे. ७९ तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. म्हणजेच राज्यातील ४०.३ टक्के तालुके अजूनही कमी पावसाच्या श्रेणीत आहेत.

सर्वात गंभीर स्थिती असलेले १४ तालुके म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्राणी, नाशिकमधील इगतपुरी, अहिल्यानगरमधील राहुरी, सोलापूरमधील उत्तर सोलापूर, कोल्हापूरमधील चंदगड व राधानगरी, लातूरमधील चाकूर, अमरावतीमधील अचलपूर व चिखलदरा, वर्ध्यातील हिंगणघाट आणि नागपूरमधील कुही या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे.

राज्यात १२९ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १३३ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. आता सर्वांचे लक्ष सप्टेंबर महिन्यातील पावसाकडे लागले आहे.

युवा मेलघाट न्यूज़ चैनल ला Follow करा…
https://whatsapp.com/channel/0029Vb7sAujK0IBi6xYEtI3C

—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment