अमरावती जिल्ह्यातून भरती परीक्षा सुधारणेसाठी सूचना मागविल्या : 16 सप्टेंबरपर्यंत ई-मेलवर पाठवा अभिप्राय
अमरावती, दि. 11 – राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल आता जिल्हास्तरावर पोहोचले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला सूचना देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी आशीष येरेकेर (भा.प्र.से) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले की, राज्यातील भरती प्रक्रियेला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, इच्छुक नागरिक बुधवार दि. 09 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर आपल्या लेखी सूचना पाठवू शकतात. तसेच, दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी हॉल (नियोजन भवन) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहूनही निवेदन सादर करता येणार आहे.
या अंतर्गत परीक्षा पद्धतीचा आढावा, पारदर्शकता, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षितता, गैरप्रकारांना प्रतिबंध आणि संस्थात्मक समन्वय या सहा प्रमुख विषयांवर सूचना अपेक्षित आहेत. “आपली एक सूचना ही भविष्यातील लाखो युवकांच्या भरती प्रक्रियेला योग्य दिशा देऊ शकते,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांचे नागरिकांना आव्हान!
—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084









