मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

---Advertisement---

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क _______________________ अमरावती. स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यात यंदा रक्तदानाचा भव्य उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर भा.प्र.से. यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रुबी हॉल, हॉटेल ग्रँड महफील, कॅम्प रोड, अमरावती येथे आयोजित महारक्तदान शिबीरात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती, अमरावती जिल्हा मद्य विक्रेता संघटना आणि हॉटेल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जिल्ह्यातील १० प्रसिद्ध रक्तपेढ्यांचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये इर्विन हॉस्पिटल रक्तपेढी, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी आणि संत गाडगे बाबा रक्तपेढी यांचा समावेश आहे.

धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी सांगितले की एका बाटली रक्ताने ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदानासारखे पवित्र कार्य करून आपण खऱ्या अर्थाने देशसेवा करू शकतो. त्यांनिही नागरिकांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला प्रमाणपत्र आणि आरोग्य तपासणी मोफत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.
रक्तदान हेच श्रेष्ठदान, एकाचे जीवन वाचवेल आपले योगदान.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment