मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत 10 दिवस “सेवा दशक” अभियान, आरोग्य शिबिर ते अन्नदानपर्यंत विविध उपक्रम

---Advertisement---

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत 10 दिवस “सेवा दशक” अभियान, आरोग्य शिबिर ते अन्नदानपर्यंत विविध उपक्रम

युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि अमरावती
अमरावती: राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने “सेवा दशक” या 10 दिवसीय लोकपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती आज अमरावती श्रमिक पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या “सेवा दशक” अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर, तसेच महसूल विषयक अडचणी सोडवण्यासाठी “महाराजस्व अभियान” राबवले जाणार आहे.

पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळ आणि पाणी वाटप, गरजू व निराधार लोकांसाठी कपडे वाटप, शहरभर स्वच्छता मोहीम आणि अन्नदान असे उपक्रमही या 10 दिवसांत राबवले जातील. जनसेवेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या पत्रकार परिषदेला आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजेशजी वानखडे, जयंतजी डेहनकर, शिवरायजी कुलकर्णी, महापौर श्रीचंदजी तेजवानी, दिनेशजी सूर्यवंशी, किरणजी पातुरकर, तुषारजी भारतीय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. जनसेवेचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

धारणीत भाजपकडून 22 जुलैला भव्य रक्तदान शिबिर धारणी: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी धारणी शहर मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “सेवा दशक” अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

रक्तदान हे सर्वात मोठे दान अर्थात ‘महादान’ मानले जाते. आपल्या रक्ताच्या काही थेंबांमुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळू शकते, हा संदेश घेऊन भाजपने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे रक्तदान शिबिर बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता पासून शासकीय ब्लड बँक, उपजिल्हा रुग्णालय, धारणी येथे आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी धारणी शहर मंडळाकडून करण्यात आले आहे. “सुपंथ पर बढे चलो, भला हो जिसमें देश का, वो काम तुम करे चलो” या भावने सर्वांनी या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

Leave a Comment