मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

लोकनेते स्व. भाऊसाहेब साबळे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी; ४५२ रुग्णांची तपासणी, ९० गुणवंतांचा सन्मान

---Advertisement---

लोकनेते स्व. भाऊसाहेब साबळे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी; ४५२ रुग्णांची तपासणी, ९० गुणवंतांचा सन्मान

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क
नया अकोला | लोकनेते व माजी आमदार स्व. भाऊसाहेब साबळे यांची जयंती शनिवार दि. १ जुलै २०२६ रोजी स्मृती सेवाश्रम, नया अकोला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश साबळे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. भाऊसाहेब साबळे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. या निमित्ताने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), प्राथमिक आरोग्य केंद्र वलगाव, निमा आयुर्वेद फोरम अमरावती आणि स्मृती सेवाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य व निशुल्क महाआरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर ८२ गरजू रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), वर्धा येथे रवाना करण्यात आले. शिबिरात डॉ. अभिषेक जोशी, डॉ. अमोल ठवळी, डॉ. अंकुश मानकर, डॉ. विजय खंडारे, डॉ. डालके, डॉ. मेश्राम मॅडम यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

जयंतीनिमित्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्तायादीत स्थान मिळवलेल्या ९० विद्यार्थ्यांचा उपमहापौर श्री. सचिन भेंडे, श्री. सुनील राणा, श्री. गोपालभाऊ कडू, श्री. प्रशांत वानखडे व श्री. पवन हिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय १५ गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. चामुंडा देवी आदिवासी महिला बचत गटाला केटरिंग साहित्य प्रदान करण्यात आले. गोपाळपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी पुरी कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेशही देण्यात आला.

कार्यक्रमात श्री. विलासराव राऊत, श्री. प्रभाकरराव गुल्हाने, श्री. दिवाकरराव सगणे, श्री. योगेश बोबडे, श्री. विकास महाराज सोळंके व श्री. विश्वासराव डुकरे या ज्येष्ठ व रुग्णसेवकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुला खान, गणेशराव कडू, राहुल तायडे, सागर महल्ले, सचिन साबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

Leave a Comment