भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
युवा मेलघाट न्यूज़ ____________________________________________ भोंडिलावा, ता. धारणी, दि. २१ सप्टेंबर – ग्राम भोंडिलावा, ता. धारणी येथे वनहक्क कायद्यानुसार पात्र दावेदारांचे प्रलंबित वनहक्क दावे नियमानुसार तपासून उपलब्ध पुरावे व कायदेशीर निकषांच्या आधारे सर्व पात्र दावे मंजूर करून पात्र शेतकरी व दावेदारांना वनहक्काचे पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हा संघटक मन्ना दारसिंबे यांनी या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले असून ग्रामस्थांच्या वतीने भूमिका मांडली आहे.
सन २००५ पूर्वीपासून संबंधित वनजमिनीवर वास्तव्यास असलेल्या अथवा पारंपरिकरित्या शेती करणाऱ्या पात्र कुटुंबांच्या दाव्यांचा कायद्यानुसार योग्य विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच वनहक्क दाव्यांची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पुरावे तसेच ग्रामसभा व संबंधित समित्यांची भूमिका याबाबत ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी. पात्र असूनही दावे प्रलंबित किंवा नामंजूर राहिले असल्यास त्याची कारणे स्पष्ट करून नियमानुसार पुढील कार्यवाहीची संधी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.



पात्र वनहक्क दावेदारांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळालाच पाहिजे या मागणीसाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शेतकरी व ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी उपसरपंच कुंजीलाल जांबेकर, सुरेश जावरकर, राकेश मावस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मिडिया प्रभारी सतीश भिलावेकर आणि जयकुमार पटोरकर यांनी माहिती दिली.
धारणी चा राजा श्री महाकाल मित्र गणेश उत्सव मंडळ, प्रभाग क्रमांक 10,भावसार मोहल्ला धारणी
चन्द्रिका ज्वेलर्स चे संचालक श्री रामगोपाल जी सोनी यांच्या निवासस्थानी श्री गणेशा चे दर्शन व महाप्रसाद









