मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

---Advertisement---

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क ________________________ _दर्यापूर, दि. २१ सप्टेंबर – दर्यापूर तालुक्यासह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकरी व ग्रामीण जनतेला आर्थिक मदत, कर्जविषयक दिलासा, रोजगार, चारा व पाण्याची व्यवस्था करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व नागरिकांनी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी तहसीलदार, दर्यापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री व महसूलमंत्री यांना निवेदन सादर केले.

दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती पावसावर अवलंबून आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची वाढ, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि उत्पादनातील संभाव्य घट यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान, पावसातील खंड, पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, पाणीसाठे आणि पीकनुकसान यांचा सर्वंकष आढावा घेऊन दर्यापूर तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागांचा विशेष आढावा घेऊन दुष्काळी उपाययोजना लागू करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई देणे, सर्व शेतीकर्जांबाबत कर्जमाफीचा निर्णय घेऊन कर्जवसुलीला स्थगिती देणे, मनरेगाच्या माध्यमातून वर्षाला २०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणे, मोफत चारा छावण्या सुरू करणे, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे तसेच पीकनुकसानीचे तातडीने पंचनामे करून नियमानुसार नुकसानभरपाई देणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शेतमालाची C2+50 टक्के सूत्रानुसार हमीभावाने खरेदी करावी, विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करावा, उपलब्ध पाण्यात पिण्याचे पाणी व शेतीला प्राधान्य द्यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, बटाईदार व वाटेकऱ्यांनाही मदत योजनांचा लाभ द्यावा, शेतीपंपांची वीजजोडणी खंडित करू नये तसेच थकीत वीजबिल व कर्जवसुलीला परिस्थितीनुसार स्थगिती द्यावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.

दर्यापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणीटंचाई, पीकनुकसान आणि पशुधनाची परिस्थिती यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सर्वंकष सर्वेक्षण व पंचनामा करावा आणि त्याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी डॉ. अभय गावंडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), कॉ. इंजी. अनिकेत वाकपांजर, तालुकाध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सुनील गावंडे, सभापती बाजार समिती दर्यापूर, पप्पू होले, शहराध्यक्ष काँग्रेस, अंकुश कवाडकर, युवासेना प्रमुख अमरावती, बबनराव विल्हेकर, पार्थ लोडम, गुड्डू पटेल, नमित हुतके, सौरभ जळमकर, मुन्ना शेख, बबलू शेख, अतिश शिरभाते, साहेबराव वाकपांजर, नितेश वानखडे, दीपक बगाडे, दिनकर गायगोले, बाळासाहेब टोळे, जाकीर भाई, कॉ. नितीन गादे, आसिफ भाई, दादाभाऊ इंगळे, भारत आठवले, भास्कर धोटे, संतोष हागे, प्रशांत धर्माळे, कॉ. अशोक कोकाटे, पवन पतंगे, अंकुश कोरडे, अब्दुल समीर, शुभम कडू यांच्यासह शेतकरी, शेतमजूर व नागरिक उपस्थित होते.

शासनाला आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात. शेतकरी व ग्रामीण जनतेला आर्थिक मदत, कृषी सहाय्य, पाणी, चारा आणि रोजगाराच्या माध्यमातून तातडीचा दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाच्या माध्यमातून शासनाला देण्यात आला.


---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

Leave a Comment