मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

---Advertisement---

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली ; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

युवा मेलघाट न्यूज | विशेष प्रतिनिधी
धारणी दि. 5 अगस्त 2026 | धारणी शहरात विशेष गहन संशोधन अर्थात SIR अभियानांतर्गत मतदार जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या रॅलीला महसूल, पोलीस, शिक्षण विभागासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत धारणी चे तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, नायब तहसीलदार राजेश माली, धारणी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. हातात फलक आणि घोषणांसह सहभागी झालेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी “मतदार यादीत नाव नोंदवा, लोकशाही सक्षम करा” असा संदेश दिला.

रॅली दरम्यान नागरिकांना मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्याचे, नवीन पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आणि माहिती वेळेवर अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. विविध जनजागृती फलक आणि संदेशांमधून मतदानाचा अधिकार आणि एक व्यक्ती – एक मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे नागरिकांना आवाहन
यावेळी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी नागरिकांना थेट आवाहन केले. “लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. आपला एक मत देशाचे भवितव्य ठरवतो. त्यामुळे 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व तरुण-तरुणींनी, तसेच नाव वगळले गेलेल्या नागरिकांनी तात्काळ मतदार नोंदणी करावी. प्रशासन यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा.” प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष जनसंपर्क पुनरीक्षण अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र नागरिकांची मतदार यादीत समाविष्टी करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे स्वागत केले.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

मेळघाटच्या १४,४९१ मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित: ८ ऑगस्ट शेवटची तारीख; उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन, वेळेत न भरल्यास नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता

Leave a Comment