मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

पोलीस स्टेशन धारणी येथील पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासाच्या आत केले गजाआड

---Advertisement---

पोलीस स्टेशन धारणी येथील पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासाच्या आत केले गजाआड

युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि धारणी
धारणी – दिनांक 10/09/2026 रोजी पोलीस स्टेशन धारणी येथे फिर्यादी नामे हिरालाल भैय्यालाल जावरकर वय 55 वर्ष यांनी दिलेल्या जबाबी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 07/09/2026 रोजी रात्री 02.00 वा. ते दि 08/09/2026 रोजी सकाळी 08.30 वा. दरम्यान फिर्यादीचा मुलगा मुकेश हिरालाल जावरकर वय 27 वर्ष याचा, गावातील सुरेश मावस्कर याच्या पत्नीची छेडछाड केल्याच्या रागातून, सुरेश मावस्कर आणि त्याचे नातेवाईक सुरेश काल्या धांडे, कुवरसिंग भिलावेकर व सुनील मावस्कर यांनी संगनमत करून डोक्यास व खांद्यावर मारहाण करून गळा दाबून खून केला. याप्रकरणी पो.स्टे. धारणी येथे अपराध क्र 642/2026 BNS कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेच्या गांभीर्याची दखल घेत मा. पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांनी आरोपींचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तात्काळ तपास पथक स्थापन करून ग्राम भुलोरी येथे रवाना केले.

सुरुवातीला आरोपी त्यांच्या राहत्या ठिकाणी मिळून आले नाहीत. मात्र गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एका शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने भुलोरी शेतशिवारात शोध घेऊन चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटकेतील आरोपी :

  1. सुरेश सुभाष मावस्कर, वय 22 वर्ष
  2. सुनील लालचंद मावस्कर
  3. कुवरसिंग धिंगा-या भिलावेकर
  4. सुरेश काल्या धांडे

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा. श्री निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोटेवाड, SDPO सहा. पोलीस अधीक्षक इशानी आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, सपोनि शिवचरण डोंगरे, सपोनि संदिप पाटील, पोउनि विशाल राठोड, स.फौ गोरेलाल चिमोटे, पोहेकॉ सतिश राठोड, पोहेकॉ भिमसिंग उईके, पो.हे.कॉ. जयकुमार मेटांगे, पो.कॉ. जगत तेलगोटे व पो.कॉ. अविनाश राजणेकर यांनी केली.

—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment