मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत भेसळयुक्त दूध विक्री करणार्यांचे धाबे दणाणले: FDA ने २ डेअऱ्यांवर टाकला छापा, ४ नमुने जप्त; लवकरच दुध का दुध, पाणी का पाणी होणार

---Advertisement---

धारणीत भेसळयुक्त दूध विक्री करणार्यांचे धाबे दणाणले:
FDA ने २ डेअऱ्यांवर टाकला छापा, ४ नमुने जप्त
लवकरच दुध का दुध पाणी का पाणी होणार

पनीर आणि दुधाचा महापूर कसा? नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला जाग

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
धारणी शहरात भेसळयुक्त दुधाचा व्यापार राजरोसपणे सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धारणीतील दोन मोठ्या डेअरींवर छापा टाकून चार दुधाचे नमुने जप्त केले आहेत. मात्र कारवाईनंतरही शहरात भेसळयुक्त दूध विक्री कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पनीरसाठी लागणारे दूध कुठून येते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोठया प्रमाणात पनीर आणि दूध विकले जात असल्याने भेसळीचा संशय बळावला होता. मेळघाटात कार्यवाही कधी?याबाबत युवा मेलघाट न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर FDA विभागाला जाग आली.

FDA च्या पथकाने गुरुवारी धारणीतील दोन डेअरीमधून चार वेगवेगळ्या दुधाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच दूध भेसळयुक्त आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.

पनीरसाठी दूध येते कुठून?
धारणीत पनीरची मागणी मोठी आहे, मात्र त्या तुलनेत दुधाचे उत्पादन कमी आहे. तरीही बाजारात मुबलक पनीर उपलब्ध होते. त्यामुळे हे पनीर भेसळयुक्त दुधापासून बनवले जात आहे का? असा गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध हे रसायनयुक्त तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.

सध्या FDA ने नमुने घेतले असले तरी प्रत्यक्षात कारवाई काय होते याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment