मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

---Advertisement---

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

युवा मेलघाट न्यूज़|प्रतिनिधि धारणी______________________ धारणी 6 ऑगस्ट 2026| धारणी नगर पंचायतीच्या सुमारे 4 कोटी रुपये किमतीच्या विकास कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ऐनवेळी “No Due” प्रमाणपत्राची अट समाविष्ट केल्याने प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे मर्जीतील कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा काही लोकप्रतिनिधींनी केला आहे.

या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना लेखी पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर धारणी नगर पंचायतीचे काँग्रेस गटनेते पंकज मोरे यांनी दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी मुख्याधिकारी यांना पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निविदा प्रसिद्ध करताना No Due अट नव्हती. ती नंतर टाकण्यात आली. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर अटी बदलणे हे पारदर्शकता आणि समान संधीच्या तत्वांच्या विरोधात आहे. No Due अट कोणाच्या आदेशाने, कोणत्या तारखेला आणि कोणत्या शासन निर्णयानुसार लावली याची माहिती द्यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर निविदा प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिंदे सेनेचे स्वच्छता व आरोग्य सभापती सूरज मालवीय यांनीही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 तसेच शासनाच्या ई-निविदा नियमांनुसार निविदा प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वांना समान संधी देणारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण टेंडर प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे आणि ऑनलाईन झालेले बदल सार्वजनिक करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता जिल्हा प्रशासन या तक्रारींवर काय निर्णय घेते याकडे धारणीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

मेळघाटच्या १४,४९१ मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित: ८ ऑगस्ट शेवटची तारीख; उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन, वेळेत न भरल्यास नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता

Leave a Comment