धारणी नगरपंचायतीत सियासी हलचल; कांग्रेसला खिंडार ला, काँग्रेसचे खंडन
युवा मेलघाट न्यूज, धारणी
धारणी, दि. ५ सप्टेंबर – धारणी नगरपंचायतीच्या राजकारणात आज दिवसभर मोठी खळबळ उडाली. शिवसेना (शिंदे गट) च्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने युवा मेलघाट न्यूज चा व्हाट्सअप ग्रुप वर एका अधिकृत अखबार ची न्यूज ग्रुपवर पोस्ट फारवर्ड करून दावा केला की, “धारणी नगरपंचायतीतील काँग्रेस आणि अपक्षाचे काही नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.” या पोस्टनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
विशेष बाब म्हणजे, ही पोस्ट येऊन बराच वेळ लोटला तरी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येत नसल्याने “मौनम् संमती लक्षणम्” अशी चर्चा रंगली होती. ग्रामीण भागातील कांग्रेस चा एका सरपंचाचा आपल्या समर्थकासह युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश स्थगित झाल्याची चर्चा असतानाच, शहरात निर्दलीय नगरसेवक व कांग्रेस नगरसेवकांचा काँग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले होते. युवा मेलघाट न्यूज ने या बातमीवर नगरसेवक व कांग्रेस पदाधिकारी समोर मुक सहमती किंवा खंडण अशा प्रश्न उपस्थित केला. या सर्व चर्चांवर अखेर धारणी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजा खान यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युवा मेलघाट न्यूज ला खुलासा केला आहे की, “मेरा सभी काँग्रेस के नगरसेवक और निर्दलीय नगरसेवको से बात हुई है… कोई नगरसेवक काँग्रेस छोड़ कर कही नही जा रहा है.. हम सभी नगरसेवक एक साथ थे और एक साथ रहेंगे.” राजा खान शहर अध्यक्ष असुन स्वता: नगरसेवक आहे त्यांच्या या खंडनामुळे सध्या तरी नगरपंचायतीतील फुटीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.
राजकारणात ही कोरी अफवाबाजी होती की, पाणी कुठे मुरत आहे? राजकारणात काहीही होऊ शकते, हि शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे विदर्भ सह जिल्हयात माजी मंत्री व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतुत्वात शिवसेनेचा पक्ष चा विस्तार शुरू आहे. अनेक नेता व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. राजकारणात मोठी घडामोडी शुरु आहे. अश्यात दावा शिवसेनेचा आणि खंडन काँग्रेसचा, अशा दुहेरी स्थितीत धारणीकरांचे लक्ष आता पुढील घडामोडींकडे लागले आहे.








