मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी नगरपंचायतीतील घरकुल योजनेत भ्रष्टाचार; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

---Advertisement---

धारणी नगरपंचायतीतील घरकुल योजनेत भ्रष्टाचार; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

धारणी, दि. 10 – धारणी नगरपंचायत हद्दीतील घरकुल योजनेच्या मंजूर लाभार्थी यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप युवा स्वाभिमान पार्टीने केला आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरीय स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाचे मेलघाट विधानसभा प्रमुख दुर्योधन जावरकर यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी भाऊ राणा यांच्या मार्गदर्शनाखाली, जावक क्र. 522 अन्वये दि. 10/09/2026 रोजी हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धारणी नगरपंचायत हद्दीतील घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याबाबत वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

विशेष म्हणजे, ज्या व्यक्तींकडे आधीपासूनच पक्की घरे आहेत, अशा अपात्र व्यक्तींनाही घरकुलचा लाभ देण्यात आला आहे. तर खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संपूर्ण यादीची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हास्तरीय स्वतंत्र समिती गठीत करावी, मंजूर यादी, लाभार्थ्यांची पात्रता, प्रत्यक्ष घराची स्थिती आणि वितरित निधीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि चौकशी अहवालाची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणीही जावरकर यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (राजस्व) धारणी आणि मुख्याधिकारी, नगर पंचायत धारणी यांना देण्यात आल्या आहेत.

पोलिस अधिक्षक नीकेतन कदम यांचे नागरिकांना आव्हान!💫युवा मेलघाट न्यूज
चैनल ला follow करा….👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7sAujK0IBi6xYEtI3C

–Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment