मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत “ऑपरेशन कवच” अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृति रैली; शेकडो नागरिकांचा सहभाग

---Advertisement---

धारणीत “ऑपरेशन कवच” अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृति रैली, शेकडो नागरिकांचा सहभाग: पोलीस अधीक्षक निकेतन क़दम यांची संकल्पना, ठाणेदार अवतारसिंग चव्हाण आणि नगराध्यक्ष सुनील चौथमल यांचे नागरिकांना मार्गदर्शन

युवा मेलघाट न्यूज ब्यूरो
धारणी 18 जुलै 2026 | मा. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आणि जिल्ह्यात वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन कवच” अंतर्गत शनिवार, 18 जुलै 2026 रोजी धारणी शहरात भव्य व्यसनमुक्ती जनजागृति रैलीचे आयोजन करण्यात आले. ही जनजागृति रैली धारणी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सकाळी 9 वाजता जयस्तंभ चौक, धारणी येथून या रैली ला प्रारंभ झाला.

शेकडो नागरिकांचा सहभाग – जनजागृति रैलीत धारणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, नगरपंचायत पदाधिकारी, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात व्यसनमुक्तीचे व वाहनचालकांना हेल्मेट घालण्याचे आवहानात्म फलक होते. विद्यार्थी व नागरिकांनी घोषणांसह संपूर्ण शहरातून ही जनजागृति रैली काढण्यात आली. रैली चे समापन धारणी बस स्थानक येथे झाले. बस स्थानक येथे आयोजित सभेत धारणी नगरपंचायत अध्यक्ष मा. सुनील चौथमल आणि धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. अवतारसिंग चव्हाण यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत नागरिकांना मार्गदर्शन केले. ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि संशयित हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. सभेच्या शेवटी सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी व्यसनमुक्त राहण्याची सामूहिक शपथ घेतली.

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संकल्पनेतुन आपरेशन ‘कवच’ पोलिस अधिक्षक निकेतन क़दम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतुत्वात धारणी पोलिस प्रशासनाचा स्ततृय उपक्रम | YouTube वर पूर्ण विडियो बघा

“ऑपरेशन कवच” म्हणजे काय?
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यातील तरुणांना व्यसनाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी “ऑपरेशन कवच” ही मोहीम हाती घेतली आहे. गांजा, एमडी, हेरॉईन, कोकेन आणि इतर मादक पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच जनजागृतीद्वारे समाजाला व्यसनमुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांना कुठेही मादक पदार्थांची विक्री किंवा तस्करी दिसल्यास घाबरू नका. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
आपत्कालीन हेल्पलाइन:
पोलीस हेल्पलाइन: 112
अमरावती ग्रामीण पोलीस: 7030006819
सायबर हेल्पलाइन: 1930 ||पोलीस प्रशासनाचे आवाहन||
या मोहिमेच्या यशासाठी पोलीस प्रशासनाने सर्व पालक आणि जागरूक नागरिकांना सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “ऑपरेशन कवच” ही केवळ गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम नसून, जिल्ह्याच्या युवकांना सुरक्षित भविष्य देण्यासाठीचे एक निर्णायक पाऊल आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

Leave a Comment