मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत पोलिसांची धडक कारवाई; 399 ग्रॅम गांजासह 45 वर्षीय इसमाला अटक, NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

---Advertisement---

धारणीत पोलिसांची धडक कारवाई; 399 ग्रॅम गांजासह 45 वर्षीय इसमाला अटक, NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

युवा मेळघाट न्यूज – प्रतिनिधि धारणी
धारणी शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून धारणी पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात गांजा साठा करून विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईत 399 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 20 हजार रुपये आहे.

नेमकी घटना काय? पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने 31 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नेहरू नगर धारणी येथे राहणारा सैय्यद आरिफ सैय्यद बशीर वय 45 वर्ष हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राहत्या घरात गांजा साठवून विक्री करत आहे.

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन राजपत्रित अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप आबा शेवाळे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पथकासह छापा टाकला. पंच आणि फॉरेन्सिक पथकासह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 399 ग्रॅम गांजा मिळून आला.

या प्रकरणी आरोपी सैय्यद आरिफ सैय्यद बशीर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन धारणी येथे अपराध क्रमांक 614/2026 कलम 8(क), 20(ब) ii, 22(ब) NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत सपोनि संदीप पाटील, पोलीस हवालदार सतीश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल जगत तेलगोटे, आदित्य सुरनार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता सोनोने, वंदना तायडे, फोटोग्राफर, मापारी, फॉरेन्सिक पथक तसेच शासकीय पंच यांचा सहभाग होता.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment