मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 सुरू; 30 जून पासून BLO च्या गृहभेटी

---Advertisement---

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 सुरू; 30 जूनपासून BLO च्या गृहभेटी
“पात्र मतदार वंचित राहणार नाही” – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन
नाव तपासण्यासाठी http://voters.eci.gov.in ला भेट द्या; आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार

युवा मेलघाट न्यूज | धारणी
धारणी दिनांक: 16 जून 2026 | मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यभर मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत दि. 30 जून ते 21 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती अद्ययावत करणार आहेत. गृहभेटीपूर्वी काय करावे?: निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, BLO च्या भेटीपूर्वी voters.eci.gov.inया संकेत स्थळावर किंवा ECINet App वर जाऊन मागील SIR मधील स्वतःचे अथवा आई-वडिलांचे नाव, मतदारसंघ, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधून ठेवावा. यामुळे प्रत्यक्ष पडताळणीच्या वेळी अचूकता राहील व वेळ वाचेल. BLO च्या भेटीदरम्यान ही काळजी घ्या: BLO कडून दिला जाणारा गणना अर्ज आवश्यक माहिती भरून व स्वाक्षरी करून त्याची एक प्रत BLO कडे जमा करावी. जमा केल्याची पोच घेऊन दुसरी प्रत स्वतःजवळ जपून ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नाव नसल्यास ही कागदपत्रे ठेवा सज्ज: जर आपले किंवा कुटुंबातील सदस्याचे नाव मागील यादीत नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल: 1) जन्माचा दाखला, 2) पासपोर्ट, 3) इ. 10 वी चे प्रमाणपत्र, 4) रहिवासी प्रमाणपत्र, 5) जात प्रमाणपत्र, 6) सरकारी/निमसरकारी ओळखपत्र, 7) कुटुंब नोंदवही, 8) जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, 9) वन हक्क प्रमाणपत्र, 10) राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, 11) 1 जुलै 1987 पूर्वीचे बँक, टपाल किंवा जीवन विमा महामंडळाचे ओळखपत्र. विशेष म्हणजे आधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

"सहकार्य करा"-प्रशासनाचे आवाहन: मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने "कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही" हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ही मोहीम राबवली आहे. धारणीचे सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला (IAS) व तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी नागरिकांना BLO ना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मतदार मदत केंद्र: अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक 1800 22 1950 वर संपर्क साधावा किंवाECINet App` डाउनलोड करावे. 2002 च्या मतदार यादीतील तपशील देखील ऑनलाईन उपलब्ध आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment