मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत 15-16 जूलाई ला मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम, BLO ना तहसीलदार यांचें आदेश

---Advertisement---

धारणीत 15-16 जूलाई ला मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम, BLO ‌ना तहसीलदार यांचें आदेश

युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि धारणी
धारणी दि.15 जुलाई 2026 | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धारणी शहरात मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अर्थात SIR अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने 15 जूलाई आणि 16 जूलाई 2026 रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, धारणी यांनी यासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पत्र जारी करून सूचना दिल्या आहेत.

तहसिल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार धारणी शहरात एकूण 12917 मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 9692 मतदारांना गणना फॉर्म म्हणजेच Enumeration Form चे वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी केवळ 2385 फॉर्मच आतापर्यंत डिजिटाइज करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेचा विचार करता अजूनही मोठ्या प्रमाणात फॉर्म भरणे आणि डिजिटाइज करणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी दोन दिवसांची विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेत 15 आणि 16 जूलाई रोजी सकाळी 10 वाजेपासून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ठराविक ठिकाणी उपस्थित राहून मतदारांचे फॉर्म भरून घेणार आहेत.

यादी भाग क्रमांक 73, 74, 83 आणि 84 साठी मेळघाट टॉकीजच्या मागे तर यादी भाग क्रमांक 75, 76, 77, 78, 79, 80, 81 आणि 82 साठी रंगभवन, धारणी या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांचे नव्याने नाव नोंदविणे, नाव कमी करणे तसेच पत्त्यातील बदल आदी कामे केली जाणार आहेत.

तहसिलदारांनी धारणी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत उपस्थित राहून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी अमरावती, नगरपंचायत धारणी आणि सर्व नगरसेवकांना देखील देण्यात आली आहे जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचेल.

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment