मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी वनपरिक्षेत्र – टिंगऱ्या येथे गोठ्यात लपवलेला सागवान साठा उघड

---Advertisement---

धारणी वनपरिक्षेत्र – टिंगऱ्या येथे गोठ्यात लपवलेला सागवान साठा उघड

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क
धारणी : मेळघाटातील सागवान तस्करांवर आळा घालण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. खाया बीट मधील टिंगऱ्या गावात सोमवारी वनविभागाने गोपनीय माहितीवरून टाकलेल्या धाडीत मोठा अवैध साठा हाती लागला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गावातील रहिवासी प्रकाश आरोटकर याने आपल्या घरामागील गोठ्यात 27 नग सागवान फळ्या चोरून लपवून ठेवल्या होत्या. सुमारे 0.377 घनमीटर असलेल्या या लाकडाची बाजारातील किंमत 35 हजार 473 रुपये आहे. वन पथकाने पंचनामा करून संपूर्ण माल जप्त केला.

अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, परतवाड्याचे उपवनसंरक्षक गणेशन यांच्या सूचना आणि धारणीचे सहाय्यक वनसंरक्षक एस.एस. शिरसाट यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. धारणी परिक्षेत्र अधिकारी एल.एम. शेख यांनी या पथकाचे नेतृत्व केले.

या पथकात वनपाल चंद्रे, मेटकर, वनरक्षक काळे, धांडे, इंगोले आणि वनमजूर शेख, वानखडे यांनी कामगिरी बजावली. जप्त मुद्देमाल धारणी वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आला असून पुढील चौकशी वनपाल पी.एस. चंद्रे करीत आहेत.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment