मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य उत्सव – “योग हा जीवनाचा आधार”

---Advertisement---

भाजपा शहर मंडळ धारणी व पतंजलि योगपीठ हरिद्वार, धारणी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने धारणीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य उत्सव –योग हा जीवनाचा आधार”

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क –
धारणी, २१ जून २०२६: रविवारची पहाट धारणीकरांसाठी आरोग्यदायी ठरली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महात्मा फुले खुले रंगभवनाचे प्रांगण सकाळी ५.३० पासूनच नागरिकांनी फुलून गेले होते. भाजपा शहर मंडळ धारणी व पतंजलि योगपीठ हरिद्वार, धारणी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य योग सत्राचे नेतृत्व भाजपा मेळघाट जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रभूदासजी भिलावेकर यांनी केले.

ठीक ६ वाजता शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगगुरु श्री. रमेशजी नांदुरकर सर व पतंजलि योगपीठाचे श्री. ललित जोशी यांनी उपस्थितांना प्रथम सूक्ष्म व्यायाम प्रकार शिकवले. मान, खांदे, कंबर मोकळी केल्यानंतर ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन अशा विविध आसनांचे टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिक झाले. त्यानंतर अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायामाने संपूर्ण रंगभवन परिसर एका वेगळ्याच ऊर्जेने भरून गेला.

जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर यांनी मार्गदर्शनात सांगितले, “योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर ऋषी-मुनींनी मानवाला दिलेली जीवनपद्धती आहे. तणाव, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आधुनिक आजारांवर योग हेच खरे औषध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले, आता तो घराघरात पोहोचवणे आपली जबाबदारी आहे.”

या सत्रात पोलिस प्रशासनानेही सक्रिय सहभाग नोंदवला. API श्री. डोंगरे व API सौ. संध्या चव्हाण मॅडम आपल्या सहकाऱ्यांसह योगचटईवर दिसले. भाजपा शहर मंडळ अध्यक्ष श्री. विवेक नवलाखे, सरचिटणीस श्री. कमलेश भगत, श्री. अजय सेंगर यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. युवा मोर्चा अध्यक्ष श्री. गोविंद खरे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष श्री. विपिन कडू, श्री. रामदास नालमवार यांच्यासह नगरसेविका सौ. क्षमा चौकसे, सौ. सुनंदा भिलावेकर, सौ. मीना मोहोड, सौ. जया खंडारे, माजी नगरसेविका सौ. संगीता खार्वे, डॉ. सुरेंद्र पटेल, डॉ. दयाराम जावरकर, डॉ. सुभाष जांभेकर, ज्येष्ठ नागरिक श्री. मनोहरलाल चौकसे, अॅड. श्यामकांत पांडे, श्री. सुधाकर पकडे, श्री. लोकेश धनेवार, सौ. दुर्गा बिसंदरे यांच्यासह शेकडो योगप्रेमी दोन तास अविरत योगाभ्यासात तल्लीन झाले होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री. कमलेश भगत यांनी केले. शेवटी सर्वांनी उभे राहून “योगमय जीवन – निरोगी जीवन” व “करें योग, रहें निरोग”चा जयघोष केला. योगसत्र संपल्यावर अनेक नागरिकांनी नियमित योगवर्ग सुरू करण्याची मागणी आयोजकांकडे केली. या एका तासाच्या सामूहिक अभ्यासाने धारणीकरांना आरोग्याची नवी दिशा मिळाली, हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment