कोट्यवधी खर्चूनही दवाखाना बंदच; आरोग्यसेवेपासून वंचित नागरिकांत संताप
चिखलदरा / एकताई : प्रतिनिधी_______________________ एकताई येथे 2014-15 मध्ये बांधण्यात आलेला आयुर्वेदिक दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याशी प्रशासन खेळखंडोबा करत असल्याचा आरोप होत आहे. हा दवाखाना तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल मोतीराम धिकार यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिखलदरा यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. या दवाखान्याच्या इमारतीवर तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
२. इमारत बांधकाम झाल्यावर येथे पूर्ण वेळ 3 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती – एक आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, एक पूर्ण वेळ नर्स, एक परिचर आणि एक कंत्राटी महिला.
३. परंतु आजपर्यंत हा दवाखाना फक्त 10 महिने चालला आहे.
४. एकही कर्मचारी येथे राहत नाही. सर्वजण हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात राहतात.
५. आता या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये मंजूर झाले असून काम सुरू झाले आहे.


सध्या येथे डॉ. परिसे मॅडम यांची नेमणूक असून त्या हातरूला राहतात. त्यांनी आठवड्यातून किमान एक वेळा या भागात येणे आवश्यक आहे. तसेच DHO साहेब कधीच येत नाहीत आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा दवाखान्यात व्हिजिट देणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
इमारत आहे, पैसा मंजूर होतो, पण डॉक्टरच नाही. हा आदिवासी भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


या भागात एका दवाखान्याची अत्यंत आवश्यकता असून, कोट्यवधींची इमारत असूनही नागरिकांना उपचारासाठी हातरू, चिखलदरा येथे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येत्या 15 दिवसांत दवाखाना पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अनिल धिकार यांनी केली आहे.
—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084









